अमरावती हिंसाचार प्रकरण : भाजपा नेते प्रवीण पोटेंसह दहा जण शरण; पोलिसांनी केली अटक
अमरावती शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरूच आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत असून, यात भाजपाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. भाजपाचे नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह काही कार्यकर्ते गायब होते. अखेर हे पोटे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं. त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराचे महाराष्ट्रातील काही शहरातही […]
ADVERTISEMENT

अमरावती शहरात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी संशयितांची धरपकड सुरूच आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पोलीस हिंसाचारात सहभागी असलेल्या आरोपींचा शोध घेत असून, यात भाजपाच्या काही नेते आणि कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. भाजपाचे नेते आणि माजी पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्यासह काही कार्यकर्ते गायब होते. अखेर हे पोटे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केलं.
त्रिपुरातील तथाकथित हिंसाचाराचे महाराष्ट्रातील काही शहरातही पडसाद उमटले होते. राज्यातील नांदेड, मालेगाव, अमरावती यांसह वेगवेगळ्या शहरात या तथाकथित हिंसाचाराच्या विरोधात बंद पाळत निदर्शनं करण्यात आली होती. मात्र, अमरावती, मालेगाव आणि नांदेडात या बंदला हिंसक वळण मिळालं होतं. महत्त्वाचं म्हणजे अमरावतीत सलग दोन दिवस हिंसाचार उसळला होता.
Amravati: भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे म्हणतात, अमरावतीत हिंसाचार भडकला कारण…
याप्रकरणी पोलिसांनी तब्बल तीन हजार लोकांवर गुन्हे दाखल केलेले असून, फरार असलेले भाजपाचे नेते प्रवीण पोटे यांच्यासह दहा कार्यकर्त्यांनी आज आत्मसमर्पण केलं आहे. शुक्रवारी झालेल्या हिंसक घटनेच्या निषेधार्थ भाजपासह काही हिंदू संघटनांनी शनिवारी बंदची हाक दिली होती. याचवेळी पुन्हा एकदा हिंसेचा भडका उडाला होता.