Tiger Shroff, Disha Patani विरोधात कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी FIR

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्याविरोधात मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. कोव्हिड 19 नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये या दोघांच्या इतर मित्रांचाही समावेश आहे.

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी त्यांच्या काही मित्रांसह वांद्रे परिसरात असलेल्या बँडस्टँड भागात फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखलं आणि त्यांची चौकशी केली. मात्र आपण का बाहेर पडलो आहोत याचं कारण ते कुणीही सांगू शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ANI ने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतल्या वांद्रे पोलीस ठाण्यात टायगर श्रॉफ, दिशा पाटनी आणि त्यांच्या काही मित्रांच्या विरोधात कोव्हिड महामारी नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र पोलिसांनी कुणालाही या प्रकरणात अटक केलेली नाही. त्यांच्याविरोधात ज्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे ती कलमं जामीनपात्र आहेत. त्यामुळे त्यांना अटक करणं गरजेचं नसल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस सध्या पुढील कारवाई करत आहेत असंही समजतं आहे.

मास्क न लावणाऱ्यांवर करिना कपूर संतापली; म्हणाली…

ADVERTISEMENT

कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. काही नियम शिथील करण्यात आले असले तरीही सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. लोकांनी एकत्र येऊ नये आणि कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच बॉलिवूडचा एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी गेले तर तिथे गर्दी होऊ शकते.एवढंच नाही तर अनेक चाहते या बॉलिवूडमधल्या कलाकारांचं अनुकरण करत असतात. त्यामुळे किमान सेलिब्रिटींनी तरी जबाबदारी ओळखून वागलं पाहिजे अशाही काही प्रतिक्रिया या घटनेनंतर उमटल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT