प्रणिती शिंदेंचा भाजपवर निशाणा, नेमकं काय म्हणाल्या काँग्रेस आमदार?
सोलापूर: ‘अधिकारी जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात तेव्हा तो कोणाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. असे जर आरोप होत असतील तर शंभर टक्के कोणाचा तरी पाठिंबा आहे.’ असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने […]
ADVERTISEMENT

सोलापूर: ‘अधिकारी जेव्हा राज्याच्या गृहमंत्र्यांवर आरोप करतात तेव्हा तो कोणाच्या पाठिंब्याशिवाय होऊ शकत नाही. असे जर आरोप होत असतील तर शंभर टक्के कोणाचा तरी पाठिंबा आहे.’ असं म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी नाव न घेता भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याने सोलापूरच्या श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.
अँटेलिया प्रकरणाचे हादरे गृहमंत्र्यांपर्यंत, कसे अडकत गेले अनिल देशमुख?; पाहा सविस्तर रिपोर्ट
आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात गंभीर आरोप केले होते. त्यांच्या लेटरबॉम्बमुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, हे आरोप खोटे असल्याचं गृहमंत्री देशमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं होतं. मात्र, तरीही विरोधकांनी याप्रकरणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. याच सगळ्यावर प्रतिक्रिया देताना प्रणिती शिंदेंनी असं म्हटलं की, कुणाच्या पाठिंब्याशिवाय गृहमंत्र्यांवर अधिकारी आरोप करु शकत नाही.