Money laundering case : आरोपपत्रात अनिल देशमुखांचं नाव नाही!; ED ने सांगितलं कारण

विद्या

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केलं आहे. ईडीने तब्बल 14 विरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे. मात्र, अनिल देशमुख यांच्याच नावाचा यात समावेश नाही. यासंबंधी ईडीने खुलासा केला आहे.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप केलेला आहे. याच प्रकरणात अमंलबजावणी संचलनालय अर्थात ईडी भ्रष्टाचाराचा तपास करत आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंगच्या या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केलं असून त्यात देशमुखांच्या नाव नाही.

आरोपपत्रात देशमुख यांच्या नावाचं समावेश नसण्यामागचं कारणही ईडीने स्पष्ट केलं आहे. मनी लाँड्रिंग प्रकरण अनिल देशमुखांना अनेक वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नाहीत. त्यामुळे मनी लाँड्रिंगच्या या संपूर्ण प्रकरणात त्याचा नेमका काय सहभाग होता, हे अद्याप निश्चित झालेलं नाही, त्यामुळे तपास सुरु राहणार असल्याचं ईडीने म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

money laundering case : अनिल देशमुखांचे खासगी सचिव संजीव पलांडे निलंबित

आरोपपत्रात देशमुखांबद्दल काय?

ADVERTISEMENT

अनिल देशमुख यांनी कुटुंबीय व सहकाऱ्यांच्या मदतीने कंपन्यांचं मोठं जटिल जाळं तयार केलेलं होतं. यात स्थावर, परिवहन, रिअल इस्टेट, हॉटेल व रेस्तराँ, इतर व्यवसायाच्या माध्यमातून व्यवहार दाखवला आहे. यात अनेक गोष्टी अशा दिसून आल्या की, ज्या कसलाही देवाण-घेवाण झालेली नाही, असं दिसून आल्याचं ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

या प्रकरणाशी संबंधित 13 कंपन्या अशा आहेत, ज्याचे मालक देशमुख कुटुंबाशी संबंधित आहेत. त्याचबरोबर 13 कंपन्या अशा आहेत, ज्या देशमुख यांच्या मित्रांच्या नावे आहेत. या संपूर्ण प्रकरणात पैसा कसा फिरवला जात होता, याचा चार्ट ईडीकडून सादर करण्यात आलेला आहे.

ईडीने 14 जणांविरुद्ध हे आरोपपत्र दाखल केलेलं असून, यात मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि अनिल देशमुख यांचे तत्कालीन खासगी सचिव संजीव पलांडे व खासगी सहाय्यक कुंदन शिंदे यांचीही नावं आहेत.

‘Anil Parab-Anil Deshmukh यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी घेतले 40 कोटी’

ज्या बार मालकांनी सचिन वाझे वसुली करण्याचा आरोप केला आहे, त्याचे जबाबही आरोपपत्रात आहेत. यात सचिन वाझेचाही जबाब असून, त्याने अनिल देशमुख यांनी वसुली करण्यास सांगितलं होतं, असं म्हटलेलं आहे. वसुली केलेला पैसा कुंदन शिंदेला द्यायला सांगितलेलं होतं, असंही वाझेनं म्हटलेलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT