बदनामी प्रकरणी माफी मागा अन्यथा.., संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना पाठवली कायदेशीर नोटीस

मुंबई तक

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस धाडली आहे. काही दिवसांपूर्वी PMC बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाले असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या प्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे. काय म्हणाले आहेत संजय […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कायदेशीर नोटीस धाडली आहे. काही दिवसांपूर्वी PMC बँक घोटाळ्यातील पैसे शिवसेना नेते संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळाले असा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या प्रकरणी ही नोटीस धाडण्यात आली आहे. संजय राऊत यांनी ट्विट करून यासंदर्भातली माहिती दिली आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

‘माझ्या विरोधात आणि माझ्या पत्नीच्या विरोधात चंद्रकांत पाटील यांनी चुकीचे आरोप केले आहेत. त्यांनी केलेल्या आरोपांना काहीही आधार नाही. असे बिनबुडाचे आरोप करून चंद्रकांत पाटील यांनी माझी आणि माझ्या कुटुंबाची बदनामी केली आहे. याप्रकरणी जर त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर मी पुढची कायदेशीर कारवाई करेन आणि कोर्टात जाईन’ असं संजय राऊत यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

चंद्रकांत पाटील यांनी काय आरोप केला होता?

हे वाचलं का?

    follow whatsapp