आर्यन खान ड्रग्ज केसचा तपास आता संजय सिंग यांच्याकडे, वाचा सविस्तर कोण आहेत संजय सिंग?
आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणातले चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे आता आर्यन खान प्रकरण, समीर खान ड्रग्ज प्रकरण यासह एकूण सहा प्रकरणांमधल्या चौकशीत नसणार आहेत कारण दिल्ली एनसीबीने तसे आदेश दिले आहेत. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कारवाई करून आर्यन खानला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात […]
ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणासह एकूण सहा प्रकरणातले चौकशीचे अधिकार समीर वानखेडे यांच्याकडून काढून घेण्यात आले आहेत. समीर वानखेडे हे आता आर्यन खान प्रकरण, समीर खान ड्रग्ज प्रकरण यासह एकूण सहा प्रकरणांमधल्या चौकशीत नसणार आहेत कारण दिल्ली एनसीबीने तसे आदेश दिले आहेत. समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबरला कारवाई करून आर्यन खानला अटक केली होती. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंवर खोटी कागदपत्रं सादर करून आरक्षण मिळवल्याचे, धर्म बदललेला लपवल्याचे, निकाह आणि तलाक लपवल्याचे आरोप केले होते. तसंच त्यांच्या उंची राहणीमानावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. ज्यानंतर समीर वानखेडेंकडून ही प्रकरणं काढून घेण्यात आली आहेत.
आर्यन खान प्रकरणाचा तपास हा आता संजय सिंग यांच्याकडे असणार आहे. संजय सिंग हे दिल्लीत एनसीबीच्या मुख्यालयात कार्यरत आहेत. ओदिशाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. आपण जाणून घेऊ कोण आहेत संजय सिंग?
संजय सिंग हे 1996 च्या भारतीय पोलीस सेवा (IPS) ओदिशाचे अधिकारी आहेत. सध्या ते दिल्लीतील एनसीबी मुख्यालयात कार्यरत आहेत. ओदिशाचे अतिरीक्त पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी काम केलं आहे. त्यानंतर त्यांची बदली दिल्ली एनसीबीच्या मुख्यालयात करण्यात आली.