प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळे आर्यन खान पार्टीमधे गेला होता’
प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूझ पार्टीत गेला होता असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला आणि ऋषभ सचदेवा या तिघांनाही NCB ने ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं. ते का सोडून देण्यात आलं याचं उत्तर NCB ने द्यावं अशीही मागणी नवाब मलिक यांनी […]
ADVERTISEMENT

प्रतीक गाबा आणि आमीर फर्निचरवाला यांनी बोलावल्यामुळेच आर्यन खान त्या क्रूझ पार्टीत गेला होता असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. तसंच प्रतीक गाबा, आमीर फर्निचरवाला आणि ऋषभ सचदेवा या तिघांनाही NCB ने ताब्यात घेतलं होतं. मात्र त्यांना सोडून देण्यात आलं. ते का सोडून देण्यात आलं याचं उत्तर NCB ने द्यावं अशीही मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.
कोण आहेत प्रतिक गाबा, फर्निचरवाला
प्रतिक गाबा हा क्रूझवरील पार्टीचा को-ऑर्डिनेटर होता. त्यानेच आर्यन खानला पार्टीसाठी निमंत्रित केलं होतं. आर्यनने तशी माहितीच दिललेली आहे. तसेच आमीर फर्निचरवाला यांनीही आर्यनला पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. या दोघांचाही या पार्टीच्या आयोजनात सहभाग असल्याचं सांगितलं जातं.
प्रतीक गाबा , आमीर फर्निचरवाला यांचा कोर्टात उल्लेख