आर्यनची झलक पाहणं पडलं महागात, आर्थर रोड बाहेर चोरट्यांनी खिसे कापले; 10 मोबाइलही अलगद उडवले

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची अखेर आज (30 ऑक्टोबर) ड्रग्स प्रकरणात आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आणि तब्बल 28 दिवसानंतर आर्यन मन्नतवर परतला. दरम्यान, तुरुंगातून बाहेर येणाऱ्या आर्यनची एक झलक पाहण्यासाठी त्याचे अनेक चाहते जमले होते. त्यामुळे आर्थर रोड आणि मन्नत बाहेर बरीच गर्दी झाली होती. याच गर्दीचा घेत चोरट्यांनी मात्र, चांगलाच हात मारला असल्याचं आता समोर आलं आहे.

आर्यनची एक झलक पाहणं हे अनेकांना महागात पडला आहे. कारण इथे चोरट्यांनी अनेक जणांचे खिसे साफ केले आहेत. आर्यन तुरुंगातून सुटणार अशी शुक्रवार संध्याकाळपासून चर्चा होती. त्यामुळे तेव्हा देखील अनेकांनी तुरुंगाबाहेर गर्दी केली होती. पण शुक्रवारी काही आर्यनची सुटका झाली नाही. त्यामुळे शुक्रवारी रात्री हे स्पष्ट झालं की, आर्यनची सुटका ही शनिवारी सकाळीच होईल.

त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा सकाळपासूनच अनेक जण हे आर्थर रोडच्या बाहेर जमा झाले होते. याच सगळ्या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी पाकिटांसह काही जणांचे मोबाइलही लांबवले. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दोन गेल्या दोन दिवसात तब्बल 10 जणांचे मोबाइल चोरीला गेले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, बऱ्याच प्रतिक्षेनंतर बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान त्याच्या घरी आला आहे. क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानची आर्थर रोड येथून सुटका करण्यात आली. यानंतर शाहरुखचा अंगरक्षक रवी त्याला घेण्यासाठी आला होता.

आर्यन आता त्याच्या घरी ‘मन्नत’मध्ये आहे. आर्यनच्या कुटुंबीयांना तो घरी परतल्याने खूप आनंद झाला आहे. यासोबतच बॉलीवूड स्टार्सही त्यांचे अभिनंदन करत आहेत.

ADVERTISEMENT

आर्यन खान 2 ऑक्टोबरपासून घरापासून दूर आहे. तब्बल 28 दिवसांनंतर आर्यन घरी परतला असून, मन्नतवर उत्साहाचे वातावरण आहे. आर्यनच्या स्वागतासाठी कालपासूनच तयारी सुरू झाली होती. शुक्रवारी संपूर्ण घरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

ADVERTISEMENT

NCB ने Aryan Khan ची केस गरजेपेक्षा जास्त खेचली – वकील मुकुल रोहतगी यांचा दावा

शुक्रवारी जामीनदार म्हणून अभिनेत्री जुही चावलाने जामीनाची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आज सकाळी ऑर्थर रोड तुरुंग प्रशासनापर्यंत आर्यन खानच्या जामीनाचे आदेश पोहोचले. त्यानंतर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून तुरुंग प्रशासनाने आर्यन खानला बाहेर सोडले. यावेळी तुरुंगाच्या बाहेर मोठी गर्दी झाली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT