वारंवार ATM मध्ये जाण्याची सवय बदला! 1 जानेवारीपासून पडणार महागात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 जानेवारी 2022 पासून एटीएममधून पैसे काढणं महाग होणार आहे. तसंच बँकांच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. 1 जानेवारीपासून मोफत मर्यादेनंतर एटीएम व्यवहारांवर शुल्क वाढवण्यास RBI ने अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे एटीएममधून मोफत व्यवहारांनंतर करण्यात येणाऱ्या व्यवहारांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

RBI ने 1 जानेवारी 2022 पासून बँकांना रोख आणि नॉन-कॅश एटीएम (ATM) व्यवहारांवर लागू होणारे शुल्क मोफत मासिक मर्यादेपेक्षा वाढवण्याची परवानगी दिली आहे. RBI च्या सूचनेनुसार, Axis Bank ने आपल्या ग्राहकांना 1 जानेवारी 2022 पासून 21 रुपये शुल्क आणि GST भरावा लागेल असा मेसेज (SMS) पाठवण्यास सुरूवात केली आहे. यापूर्वी हे शुल्क 20 रुपये होते.

जानेवारीमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्ट्यांची लॉटरी; महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना किती सुट्ट्या मिळणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

बँकांनी नेमकं का वाढवलं आहे शुल्क?

या वर्षी 1 ऑगस्ट 2021 पासून RBI ने आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहार शुल्क 15 रुपयांवरून 17 रुपये आणि गैर-आर्थिक व्यवहारांसाठी प्रति व्यवहारासाठी 5 रुपयांवरून 6 रुपये केले आहे. हाय इंटरचेंज फी आणि ऑपरेटिंग कॉस्टमध्ये वाढ झाल्यामुळे RBI ने बँकांना ग्राहकांकडून प्रति व्यवहार 21 रुपये शुल्क आकारण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे बँकांनी शुल्कात वाढ केली आहे.

ADVERTISEMENT

तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

ADVERTISEMENT

बँकांनी जरी एटीएम व्यवहार शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी सामान्य ग्राहकांना या निर्णयाची फारशी काळजी करण्याची गरज नाही. कारण या निर्णयाचा परिणाम केवळ मोफत मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार करणाऱ्या ग्राहकांवरच होणार आहे. बँका एटीएममधून एका महिन्यात त्यांच्या ग्राहकांना आर्थिक आणि गैर-आर्थिक असे पाच मोफत व्यवहार देत राहतील. याशिवाय महानगरांमध्ये राहणाऱ्या बँक ग्राहकांना इतर बँकेच्या एटीएममधून एका महिन्यात तीन मोफत व्यवहार करण्याची सुविधा आणि छोट्या शहरांमध्ये 5 मोफत व्यवहार करण्याची सुविधाही सुरू राहणार आहे.

PMC बँक खातेदारांना कसे मिळणार पैसे परत? RBI चा काय आहे नवा प्लॅन?

पुढील महिन्यापासून गुगलचे अनेक नियम बदलले जात आहेत, त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. हा नवीन नियम सर्व Google सेवा जसे की Google Ads, YouTube, Google Play Store आणि इतर सशुल्क सेवांवर लागू होईल. तुम्ही पुढील महिन्यापासून RuPay, American Express किंवा Diners कार्ड वापरत असल्यास, तुमचे कार्ड तपशील Google द्वारे सेव्ह केले जाणार नाहीत. अशा परिस्थितीत, 1 जानेवारी 2022 पासून, तुम्हाला प्रत्येक मॅन्युअल पेमेंटसाठी कार्ड तपशील प्रविष्ट करणं आवश्यक असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT