बीड: भाजपचे आमदाराविरोधात ईडीकडे तक्रार, तब्बल 1000 कोटींच्या गैरव्यवहार केलाच आरोप
रोहिदास हातागळे, बीड: माजी महसूल राज्यमंत्री व सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले भाजपचे सुरेश धस यांच्या पुढाकाराने बीड जिह्यातील आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इनाम जमिनींचे तब्बल 1000 कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लँडरिंग प्रक्रिया वापरून झाल्याचा आरोप करणारी तक्रार मंगळवारी (14 डिसेंबर) ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली. बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख […]
ADVERTISEMENT

रोहिदास हातागळे, बीड: माजी महसूल राज्यमंत्री व सध्या विधान परिषदेचे आमदार असलेले भाजपचे सुरेश धस यांच्या पुढाकाराने बीड जिह्यातील आष्टी तालुक्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये इनाम जमिनींचे तब्बल 1000 कोटी रुपयांचे गैरव्यवहार मनी लँडरिंग प्रक्रिया वापरून झाल्याचा आरोप करणारी तक्रार मंगळवारी (14 डिसेंबर) ईडीच्या मुंबई ऑफिसमध्ये दाखल करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते राम खाडे, शेख अब्दुल गनी यांनी अॅड.असीम सरोदे, अॅड.अजित देशपांडे, अॅड. अक्षय देसाई व अॅड. मदन कुर्हे यांच्या मदतीने दाखल केली आहे.
‘इनाम जमिनी ज्यामध्ये वक्फच्या व देवस्थानच्या जमिनी समाविष्ट आहेत. त्यांचे अनेक बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार माजी मंत्री व आताचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या योजनेनुसार त्यांच्यासाठी कार्यरत अनेक माणसांनी केले.’
‘हे सगळे व्यवहार करताना बेहिशेबी रकमा फिरवणे, स्वतःच काढलेल्या मच्छिंद्र मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट बँकेतून मोठ्या रकमांचे लोन मुळीच आर्थिक पात्रता नसलेल्या आपल्या कार्यकर्त्यांना देणे व त्या माध्यमातून जमिनी बळकावणे असे अनेक व्यवहार मनी लँडरिंग स्पष्ट करणारे आहेत’, असे आरोप राम खाडे यांनी तक्रारीत केले आहेत.