भाई जगताप-झिशान सिद्दीकीमध्ये पुन्हा संघर्ष; नाना पटोलेंकडून मध्यस्थी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेसचे भाई जगताप आणि झिशान सिद्दीकी यांच्यात पुन्हा एकदा संघर्ष उफाळून आला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झिशान सिद्दीकी विरूद्ध भाई जगताप असा वाद पाहण्यास मिळतो आहे.

बांद्रा पश्चिम भागातले काँग्रेस नेते झिशान सिद्दिकींनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्या विरोधात तक्रा करणारं एक पत्र सोनिया गांधी यांना लिहिलं आहे. 14 नोव्हेंबर रोजी मुंबईतल्या एका रॅलीत या दोघांच्यात झालेल्या गोंधळासंदर्भाने हे पत्र लिहिलेलं आहे. आता या दोघांची समजूत घालण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी मध्यस्थी केली आहे.

सोनिय गांधी यांना लिहिलेल्या पत्रात झिशान सिद्दीकी म्हणतात..

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मॅडम, मी अत्यंत धक्कादायक आणि अविश्वसनिय परिस्थितीत हे पत्र लिहितो आहे. काल के.सी. वेणुगोपाल आणि एच के. पाटील यांनी एक मोर्चा आयोजित केला होता. मोर्चाच्या आधी अनेक नेत्यांना राजगृहात जायचं होतं. त्यासाठीची यादीही भाई जगताप यांना देण्यात आली होती. त्या यादीत माझं नाव नव्हतं त्यामुळे मला जाऊ दिलं गेलं नाही. त्यानंतर मला शिवीगाळ करून बाहेर काढण्यात आलं एवढंच नाही तर तुला काय करायचं ते तू कर असंही सांगण्यात आलं. त्यामुळे मी हे पत्र लिहित आहे.

ADVERTISEMENT

झिशान सिद्दिकी यांनी पत्रात लिहिलं आहे की, मुंबईत 14 नोव्हेंबरला एक रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीदरम्यान भाई जगताप यांनी माझ्याशी गैरवर्तणूक केली. त्यांनी माझ्या धर्माबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले. मला धक्काबुक्की केली आणि शेकडोंच्या गर्दीसमोर माझा अपमान केला. त्यावेळी पक्षाची प्रतिमा अबाधित राखण्यासाठी मी काही बोललो नाही. पण माझी मागणी आहे भाई जगताप यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी.

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी मुंबई काँग्रेसने मोदी सरकारविरोधात एका पदयात्रेचं आयोजन केलं होतं. या यात्रेदरम्यान मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, युथ काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दिकी आणि युवा नेता सूरज सिंह ठाकूर यांच्यात राजगृहामध्ये जाण्यावरुन खटके उडाले होते. झिशान सिद्दिकी यांनाही आत जायचं होतं, मात्र त्यांना जाऊ दिलं नाही.

यासाठी नंतर स्पष्टीकरण देण्यात आलं की, आत जाण्यासाठी फक्त लोकांना परवानगी देण्यात आली होती. म्हणून फक्त ज्येष्ठ नेत्यांनाच आत जाऊ दिलं. तर जिथे वरिष्ठ नेते उभे होते, तिथे उभं राहण्यापासूनही झिशान यांना रोखण्यात आलं. या प्रकारामुळे नाराज होऊन झिशान पदयात्रा अर्धवट सोडून निघून गेले.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT