सरकारचा हिंदूविरोधी एकही आदेश ऐकणार नाही, जन्माष्टमी जोरात साजरी करणार – राम कदमांचा हल्लाबोल

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती, लसीकरण यासारख्या अनेक मुद्द्यांवर आतापर्यंत राज्यातलं महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्षातला भाजप समोरासमोर आले आहेत. आता हिंदू सणांवर निर्बंध घालण्यावरुन पुन्हा एकदा राज्यात सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना रंगण्याची चिन्ह दिसत आहेत. राज्य सरकारचा एकही हिंदूविरोधी आदेश आम्ही ऐकणार नाही आणि जन्माष्टमी जोरात साजरी करणार अशी भूमिका भाजपचे घाटकोपरचे आमदार राम कदम यांनी घेतली आहे.

दुसरीकडे मंत्री नवाब मलिक यांनीही राम कदमांच्या भूमिकेवर टीका केली आहे, त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा राज्यात संघर्ष पहायला मिळू शकतो.

जन्माष्टमीच्या सणासाठी राज्य सरकारने अद्याप मार्गदर्शक तत्व आणि नियम जाहीर केलेले नाहीयेत. पण त्याआधीच भाजपने हा सण जोरात साजरा करणार असल्याचं जाहीर केलंय. राज्य सरकार हे हिंदूविरोधी असून आम्ही त्यांचा एकही निर्णय ऐकणार नाही अशी भूमिका भाजपने घेतली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“राज्य सरकारने दारुच्या दुकानांना परवानगी दिली आहे. बिअर बारही आता नेहमीप्रमाणे सुरु झाले आहेत, पण सरकार मंदीर खुली करायला परवानगी देत नाही. ते आमच्या मार्गात अडथळा आणत आहेत. गेल्या दोन वर्षांपासून देशातली जनता या सरकारचा देशविरोधी कारभार पाहत आहे. सरकारमध्ये घरी बसणारी लोकं आता असा आदेश देत आहेत की जन्माष्टमीचा उत्सव साजरा करु नका. आम्ही सरकारचा एकही हिंदूविरोध निर्णय ऐकणार नाही, जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाईल”, अशी भूमिका राम कदम यांनी घेतली आहे. हा उत्सव साजरा होत असताना कोविडच्या सर्व नियमांचं पालन होईल याची काळजी घेतली जाईल असंही राम कदम म्हणाले.

Corona मुळे पुण्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणाने, महापौरांनी घेतलेल्या बैठकीत एकमताने निर्णय

ADVERTISEMENT

राम कदमांनी घेतलेल्या भूमिकेवर मंत्री नवाब मलिक यांनीही जोरदार टीका केली आहे. “भाजप आणि मनसेची लोकं म्हणत आहेत की ते जन्माष्टमीचा उत्सव साजरा करणार आहेत. यासंदर्भातले नियम आणि मार्गदर्शक तत्व नक्कीच जाहीर केली जातील. या नियमांचं पालन करणं ही सर्व नागरिक आणि राजकीय नेत्यांची जबाबदारी आहे.” राज्यातला विरोधी पक्ष आपल्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेला सल्ला ऐकत नसल्याबद्दल मलिकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी एकीकडे लोकांना सणसमारंभात गर्दी करु नका असं आवाहन करत आहेत. त्यांनी आपल्या नेत्यांना लोकांमध्ये जाऊन सध्याची परिस्थिती काय आहे हे सांगायला सांगितलं आहे. पण राज्यातले भाजप नेते जर मोदींचंही ऐकणार नसतील तर यासारखी वाईट गोष्ट काहीच नाही असं म्हणत मलिकांनी सरकारची बाजू मांडली. सरकारी नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असाही इशारा यावेळी मलिकांनी दिला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT