प्रमोद सावंत की विश्वजीत राणे? गोव्याच्या मुख्यमंत्रीपदावर आज लागणार मोहोर

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरवत २० जागांवर बाजी मारलेल्या भाजपने गोव्यात मगो पक्ष आणि तीन अपक्षांच्या साथीने सत्ता स्थापनेवर दावा केला आहे. परंतू अद्याप मुख्यमंत्रीपदाबाबत निर्णय न झाल्यामुळे गोव्यात भाजपचं सरकार स्थापन झालेलं नाही. माजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नावाला पक्षातील काही नेत्यांचा असलेला विरोध यामुळे ही निवड लांबल्याचं बोललं जातंय. दरम्यान भाजपचे केंद्रीय प्रभारी गोव्यात दाखल झाल्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय आज जाहीर होणार असल्याचं कळतंय.

गोव्याच्या नवनिर्वाचीत भाजप आमदारांची आज दुपारी चार वाजता बैठक बोलावण्यात आलेली आहे अशी माहिती गोवा भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. “आमचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज घेण्याचे आदेश दिले आहेत. केंद्रीय नेतृत्वाने पाठवलेले निरीक्षक नरेंद्रसिंह तोमर, एल. मुरगन, गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस, महासचिव सी.टी.रवी हे देखील गोव्यात येणार होणार आहेत.”

Goa Result : मीच मुख्यमंत्री होणार ! डॉ. प्रमोद सावंत यांना आत्मविश्वास

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार असा प्रश्न विचारला असता तानावडे यांनी त्यावर थेट भाष्य करण्यास नकार दिला. “मुख्यमंत्री कोण होईल याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेतला जाईल आणि हा निर्णय घेतल्यानंतर राज्यपालांना सत्तास्थापनेसाठी आमदारांच्या पाठींब्याचं पत्र सादर केलं जाईल. यानंतर शपथविधीची तारीख निश्चीत होईल. २३ ते २५ मार्चमध्ये हा शपथविधी होऊ शकतो पण याची तारीख केंद्राचे प्रभारी ठरवतील.”

निवडणूकीत भाजपविरुद्ध उतरलेल्या मगो पक्षाने का दिला भाजपला पाठींबा? सुदीन ढवळीकर म्हणतात…

ADVERTISEMENT

दरम्यान भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रमोद सावंत यांच्या नावालाच पसंती दर्शवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. परंतू १९ मार्चला प्रमोद सावंत आणि विश्वीजीत राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्यामुळे मुख्यमंत्रीपदाबाबतचा सस्पेन्स वाढला होता. विश्वजीत राणे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सांगितलं असलं तरीही अनेक नेत्यांच्या मते त्यांचं नाव आघाडीवर आहे.

ADVERTISEMENT

काँग्रेसला पुन्हा सुरुवात करण्याची गरज- BJP ची साथ सोडलेल्या मायकल लोबोंचा पक्षाला सल्ला

भाजपला सत्तास्थापनेसाठी होत असलेला वेळ पाहून गोवा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांनी भाजपमध्ये सारंकाही आलबेल नसून काँग्रेसला सत्तास्थापनेची संधी आली तर आम्ही सर्व पर्यायांचा विचार करु असं जाहीर केलं. ४० पैकी भाजपने गोव्यात २० जागा पटकावल्या आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT