महाराष्ट्रात तीन पक्षांनी जनमताची चोरी केली, गोव्यात आम्ही असं घडू देणार नाही-फडणवीस
गोवा, उत्तर प्रदेशसर पाच राज्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वेग आला होता राजकीय घडामोडींना. गोव्यात परिवर्तन नक्की होईल असं संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर तिकडे गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातही भाजपला बहुमत मिळेल असाही विश्वास […]
ADVERTISEMENT

गोवा, उत्तर प्रदेशसर पाच राज्यांच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता वेग आला होता राजकीय घडामोडींना. गोव्यात परिवर्तन नक्की होईल असं संजय राऊत यांनी मुंबई तकला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. तर तिकडे गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी गोव्यात पुन्हा भाजपच येणार असल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेशातही भाजपला बहुमत मिळेल असाही विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग होईल का असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता त्यावर आमचे प्रयत्न सुरू आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.
मात्र देवेंद्र फडणवीस यांनी यावर टीका केली आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे जनमताची चोरी झाली तसा प्रकार गोव्यात होऊ देणार नाही असं फडणवीस यांनी ठणकावून सांगितलं आहे.
गोव्यात होणार का महाविकास आघाडीचा प्रयोग? संजय राऊत यांनी दिलं उत्तर म्हणाले….
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
‘मला अतिशय आनंद आहे की आज गोविंद गावडे जे अपक्ष म्हणून निवडून आले होते व नंतर पाच वर्ष सरकारमध्ये मंत्री होते. त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता त्यांच्या मतदार संघात कमळ फुलणार याबद्दल कुठलीही शंका नाही. एकूणच बघितलं तर सर्वे असेल किंवा ग्राउंड रिअलिटी असेल भाजपाचं सरकार हे गोव्यात पुन्हा स्थापित होणार, या बद्दल आता फारशी शंका कुणाच्या मनात उरली नाही. आम्ही जनतेमध्ये चाललो आहोत, आमच्या रचना लावतो आहोत, केलेली कामे सांगत आहोत आणि त्या आधारवर आम्ही मत मागत आहोत’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
उत्तर प्रदेशात स्वतः प्रचाराला जाणार, समाजवादीसोबत निवडणूक लढवणार-शरद पवार
गोव्यात राष्ट्रवादीची तृणमूल किंवा काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, त्यांनी जरूर प्रयोग करावा पण त्यांना गोव्यात आम्ही संधीच देणार नाही. स्पष्ट बहुमत गोव्याची जनता ही भाजपला देईल आणि ज्या प्रकारे जनमताची चोरी तीन पक्षांनी महाराष्ट्रात केली, ती चोरी गोव्यात आम्ही होऊ देणार नाही.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा कुणाच्या कल्पनेतही नसणारा प्रयोग 2019 ला झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन झालं. आता गोव्यातही तसे प्रयत्न सुरू असल्याचे संकेत संजय राऊत आणि शरद पवार दोघांनीही दिले आहेत. मात्र या दोघांचंही म्हणणं देवेंद्र फडणवीस यांनी खोडून काढलं आहे. गोव्यात असा कोणताही प्रयोग होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे.