'देवा राजू श्रीवास्तव यांना बरं कर, आम्ही दारू सोडू,' कानपूरच्या तरुणांनी घेतली शपथ

व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या तरुणांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते झाल्यास आपणही दारूला कायमचा निरोप देऊ असा संकल्प केला.
Kanpur youth taking oath for raju Shrivastav
Kanpur youth taking oath for raju Shrivastav

राजू श्रीवास्तव यांना ब्रेन डेड घोषित करण्यात आलं आहे. गेल्या 9 दिवसांपासून डॉक्टर त्यांना बरं करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांची प्रकृतीही सुधारली होती. मात्र आता त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आता प्रार्थना हाच एकमेव आधार आहे. असाच काहीसा प्रकार कानपूरमध्येही पाहायला मिळाला. येथील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल झालेल्या तरुणांनी राजू श्रीवास्तव यांच्यासाठी प्रार्थना केली आणि ते झाल्यास आपणही दारूला कायमचा निरोप देऊ असा संकल्प केला.

तरुणांनी राजू श्रीवास्तव यांना बरं होण्यासाठी घातलं देवाला साकडं

गजोधर भैय्या उर्फ ​​राजू भैय्या हा त्यांचा आवडता विनोदी अभिनेता असल्याचे तरुणांनी सांगितले. प्रकृती अस्वास्थ्यामुळे जेव्हापासून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेव्हापासून त्यांना खूप वाईट वाटत होते. तरुणांनी त्यांच्यासाठी देवाची प्रार्थना केली आणि म्हणाले, जर देवाने राजू भैय्याला बरे केले तर आम्ही दररोज हनुमान चालीसाचे पठण करू. दारूला हात लावणार नाही. दारू पिणे कायमचे बंद करू, असं या तरुणांचं म्हणणं आहे.

व्यसनमुक्ती केंद्रात राजू श्रीवास्तव यांचे विनोद ऐकवले जातात

व्यसनमुक्ती केंद्राच्या डॉक्टरांनी सांगितले की, उपचारासाठी आलेल्या तरुणांचं मनोरंजन करण्यासाठी त्यांना राजू श्रीवास्तव यांचे विनोद ऐकवले जातात. इथले सगळे तरुण त्यांच्यावर खूप प्रेम करतात. जेव्हापासून त्यांना राजू भैय्या यांच्या आजारपणाची बातमी मिळाली तेव्हापासून त्यांना केंद्रात जावेसे वाटत नाही. खाण्यापिण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. राजू भैय्या लवकर बरे व्हावेत म्हणून दिवसरात्र देवाकडे प्रार्थना करतात, असं डॉक्टर म्हणाले. केंद्राचे प्रभारी डॉ. गौरव यांनी सांगितले की, केंद्रात हनुमान चालिसाचे पठण करून युवकांनी राजू श्रीवास्तव बरे झाले तर दारू कायमची सोडू, अशी शपथ घेतली आहे.

'घरच्यांचं ऐकलं नाही पण राजू श्रीवास्तव बरे झाले तर दारू सोडणार'

उपचारासाठी दाखल झालेल्या एका तरुणाने सांगितले की, राजू हे कानपूरचे हृदय आहे. आम्ही त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी होवो, हीच आमची प्रार्थना आहे.” दुसरा तरुण म्हणाला, “आमच्या कुटुंबीयांच्या सांगण्यावरून आम्ही दारू कधीच सोडली नाही. पण जर देवाने राजू भैय्याला बरे केले तर मी दारू कायमची सोडून देईन.

हृदयविकाराचा आला होता तीव्र झटका

10 दिवसा अगोदर राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. तेव्हापासून ते बेशुद्ध अवस्थेत आहेत. उपचाराला देखील ते प्रतिसाद देत नाही. त्यांचं ब्रेन संपूर्णपणे डेड झालं आहे. यादरम्यान त्यांच्याबाबतीत वेगवेगळ्या अफवा पसरत आहेत. या सगळ्यामध्ये राजू यांचा भाऊ दीपू याने फेसबुकवर व्हिडिओ शेअर करून त्याच्या तब्येतीची माहिती दिली. दीपूने व्हिडिओ शेअर करून सांगितले की, राजू श्रीवास्तव यांच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर पसरत आहे, मात्र ती फक्त आणि फक्त अफवाच आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in