आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप, शाळेच्या अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळला

विद्या

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन आज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. कोल्हापूर येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेचे अध्यक्ष असलेल्या गणपतराव पाटील यांच्यावर मुलाच्या आजोबांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मुलाच्या आजोबांनी कोल्हापूर येथील शिरोळी MIDC पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या शाळेच्या अध्यक्षांचा अटकपूर्व जामीन आज मुंबई हायकोर्टाने फेटाळला आहे. कोल्हापूर येथील एका आंतरराष्ट्रीय शाळेचे अध्यक्ष असलेल्या गणपतराव पाटील यांच्यावर मुलाच्या आजोबांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात पाटील यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता.

मुलाच्या आजोबांनी कोल्हापूर येथील शिरोळी MIDC पोलीस स्टेशनमध्ये अध्यक्ष पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. आपल्या तक्रारीत मुलाच्या आजोबांनी, संचालकांनी आपल्या नातवाला बोलावून घेत आपल्यासमोर त्याला ओरडत त्याचा अपमान होईल असे शब्द वापरले. तुझा काहीही उपयोग नाही, तू झोपडपट्टीतल्या मुलांसारखा वागतोय, तुझ्यासारख्या मुलांना जगायचा अधिकारी नाही, तू पृथ्वीवर भार आहेस असे शब्द वापरत आपल्या मुलाला सर्वांसमोर ओरडलं. ज्यानंतर आपल्या मुलाने आत्महत्या केल्याचं मुलाच्या आजोबांनी सांगितलं.

जाणून घ्या काय घडलं होतं तेव्हा?

आरोपी अध्यक्ष गणपतराव पाटील यांची पत्नी याच शाळेत मुख्याध्यापिका आहे. १ एप्रिलला शाळेतून मुलाच्या आजोबांना बोलावून घेण्यात आलं. आजोबा शाळेत पोहचल्यावर त्यांनी आपल्या नातवाकडे चौकशी केली असता, फुटबॉल खेळत असताना त्याने मारलेल्या किकमुळे गोलपोस्ट पडून एका मुलीला जखम झाली. ज्यानंतर मुलाने सांगितल्याप्रमाणे पाटील यांनी त्याला अश्लील शब्दांत ओरडून अपमानित केलं. ज्यानंतर आजोबा नातवाला घेऊन पाटील यांच्या भेटीसाठी गेले असता त्यांनी पुन्हा एकदा आजोबांसमोरच नातवाला कठोर शब्दांत चार गोष्टी सुनावल्या.

हे वाचलं का?

    follow whatsapp