संजय राठोडांनी हात झटकले, गर्दीतील 10 हजार जणांवर गुन्हा दाखल

मुंबई तक

वाशिम: महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्या तब्बल 10 हजार समर्थकांविरूद्ध वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी मात्र हा प्रकरणी आपले हात झटकले आहेत. संजय राठोड यांचे हजारो समर्थक हे पोहरादेवी येथे आले होते. याप्रकरणी आता वाशिम जिल्ह्याचे एसपी वसंत परदेशी यांनी 10 हजार लोकांविरूद्ध 188 […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

वाशिम: महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड यांच्या तब्बल 10 हजार समर्थकांविरूद्ध वाशिम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करणाऱ्या संजय राठोड यांनी मात्र हा प्रकरणी आपले हात झटकले आहेत. संजय राठोड यांचे हजारो समर्थक हे पोहरादेवी येथे आले होते. याप्रकरणी आता वाशिम जिल्ह्याचे एसपी वसंत परदेशी यांनी 10 हजार लोकांविरूद्ध 188 कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एसपी परदेशी म्हणाले की, ‘पोहरादेवीकडे येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलीस बंदोबस्त असूनही लोक शेतातून व जंगलातून पोहरादेवीला पोहचले. लोकांना येण्यापासून रोखण्यासाठी आम्ही पोहरादेवी संस्थानच्या सदस्यांसोबत मीटिंगसुद्धा घेतली होती.’

दरम्यान, पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात संजय राठोड हे वादाच्या भोवऱ्यात आले होते. जेव्हापासून हे प्रकरण समोर आलं होतं. तेव्हापासून संजय राठोड हे जवळजवळ अज्ञातवासात गेले होते. त्यानंतर तब्बल 15 दिवसांनी म्हणजे काल (23 फेब्रुवारी) त्यांनी पोहरादेवी येथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं होतं. मात्र, यावेळी त्यांनी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं होतं. संजय राठोड यांच्या हजारो समर्थकांनी पोहरादेवी येथे गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी याच गर्दीतील 10 हजार जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, असं असलं तरी संजय राठोड यांच्यावर मात्र कोणतीही कारवाई अद्याप करण्यात आलेली नाही.

ही बातमी देखील पाहा: मुख्यमंत्री ठाकरेंचं आवाहन संजय राठोडांनी का धुडकावलं?

हे वाचलं का?