Govt Jobs : भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती, पदवीधरांना मोठी संधी
भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती सुरु होणार आहे. या पदांसाठी पात्रतेचे निकष काय आहेत, वेतन किती मिळणार आहे, जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भारतीय रेल्वेमध्ये बंपर भरती
पदवीधरांना मोठी संधी
RRB Recruitment : भारतीय रेल्वेने देशभरातील तरुण-तरुणींसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. रेल्वे भरती बोर्डाद्वारे (RRB) नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगिरी (NTPC) अंतर्गत तब्बल 5,165 रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीमध्ये पदवीधर आणि बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी स्वतंत्रपणे पदे उपलब्ध करण्यात आली आहेत. अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबवली जाणार असून, पात्र उमेदवारांना संपूर्ण भारतात कुठेही सेवा बजावण्याची संधी मिळणार आहे.
शैक्षणिक पात्रता काय?
भरती प्रक्रियेत मुख्यत्वे दोन श्रेणींचा समावेश आहे. पदवीधरांसाठी 3,477 जागा काढण्यात आल्या असून, यामध्ये चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवाइजर, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, ज्युनिअर अकाउंट असिस्टंट कम टाइपिस्ट आणि सिनियर क्लर्क कम टायपिस्ट या पदांचा समावेश आहे. तर बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1,688 जागा असून, यात कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाउंट्स क्लर्क कम टाइपिस्ट, ज्युनिअर क्लर्क कम टाइपिस्ट आणि ट्रेन्स क्लर्क ही पदे भरली जाणार आहेत. टायपिस्ट पदांसाठी संगणकावर इंग्रजी किंवा हिंदी टायपिंगचे कौशल्य असणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : आत्महत्या करू नये म्हणून पोरगा वडिलांना सोडेना, आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत
पात्रतेचे निकष काय?
या भरतीसाठी 1 जानेवारी 2027 रोजी वयाची अट निश्चित करण्यात आली आहे. पदवीधर पदांसाठी वय 18 ते 33 वर्षे, तर बारावी उत्तीर्ण पदांसाठी वय 18 ते 30 वर्षे असावे. नियमानुसार एससी/एसटी उमेदवारांना 5 वर्षे आणि ओबीसी उमेदवारांना 3 वर्षे वयोमर्यादेत सूट देण्यात येईल. परीक्षा शुल्काचा विचार करता, सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी 500 रुपये शुल्क असेल, तर एससी, एसटी, माजी सैनिक, ट्रान्सजेंडर, ईबीसी आणि महिला उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.
हे ही वाचा : फडणवीसांच्या निर्णयावर शेतकरी रोखठोक, काय म्हणाले?
अर्जाची अंतिम मुदत काय?
या भरतीची संभाव्य अर्ज प्रक्रिया 8 ऑक्टोबर पासून सुरू होणार असून, अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर निश्चित करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया सुरु झाल्यानंतर rrb.indianrailways.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येतील.
