Sharad Pawar: अनिल देशमुखांबाबत उद्यापर्यंत निर्णय घेऊ: शरद पवार

मुंबई तक

नवी दिल्ली: ‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नवी दिल्ली: ‘आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप हे फार गंभीर आहेत. पण परमबीर सिंग यांनी बदली झाल्यानंतरच हे आरोप केले आहेत. तसंच त्या पत्रावर त्यांची सही देखील नाही. आयुक्त असताना परमबीर यांनी असे कोणतेही आरोप केले नव्हते. अनिल देशमुखांबाबत नेमका निर्णय उद्यापर्यंत सर्वांशी चर्चा करुन घेतला जाईल. त्याआधी अनिल देशमुख यांचं म्हणणं देखील ऐकून घेऊ.’ शरद पवारांनी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण प्रकरणाबाबत भाष्य केलं आहे.

दरम्यान, याचवेळी शरद पवार असंही म्हणाले की, ‘चौकशीचे सर्व अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी योग्य ती चौकशी करावी आणि निर्णय घ्यावा.’ त्यामुळे आता शरद पवारांनी यासंबंधी चेंडू मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे टोलवला आहे.

‘परमबीर सिंगांनी केलेले आरोप गंभीर पण…’

दरम्यान, यावेळी शरद पवार यांनी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांविषयी देखील काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे गंभीर आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या पत्रावर परमबीर सिंग यांची सही नाही. 100 कोटींच्या वसुलीचे आरोप देखील गंभीर आहेत. पण पत्रात या गोष्टीचा उल्लेख करण्यात आलेले नाही की, हे पैसे कसे दिले आहेत. खरं तर परमबीर यांची मुंबईच्या आयुक्तपदावरुन बदली झाल्यानंतर त्यांनी हे आरोप केले आहेत. याआधी त्यांनी यासंबंधी आरोप का केले नाही किंवा पत्र का लिहलं नाही?’ असा सवाल पवारांनी उपस्थित केला आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp