नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम आहेत: अजित पवार

नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायचा नाही या निर्णयावर मुख्यमंत्री ठाम आहेत अशी माहिती अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
chief minister uddhav thackeray is adamant on his decision not to accept nawab maliks resignation said ajit pawar
chief minister uddhav thackeray is adamant on his decision not to accept nawab maliks resignation said ajit pawar(फाइल फोटो)

मुंबई: जमीन खरेदी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या मंत्री नवाब मलिक यांचा अद्यापही राजीनामा घेण्यात न आल्याने विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला. याचविषयी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जेव्हा विचारण्यात आलं तेव्हा त्यांन स्पष्ट केलं की, अटकेचं कारण योग्य नसल्याने नवाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ठाम आहेत.

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

'नवाब मलिकांचा राजीनामा न घेण्यावर मुख्यमंत्री ठाम'

'आपल्याला माहिती ना.. की नवाब मलिक यांच्या प्रकरणाची सुनावणी उद्याच आहे. त्यांनी जी अटक करण्यात आली आहे ती योग्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हायकोर्टात उद्या सुनावणी आहे. याबद्दल स्वत: राज्याच्या प्रमुखांनी पण सांगितलं इतर मान्यवरांनी पण त्याबाबत स्टेटमेंट केलेलं आहे. सरकारची भूमिका यादेखील सांगण्यात आली आहे.'

'आपल्याला माहिती आहे का? प. बंगालमध्ये काही विद्यमान मंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. तरी देखील ते अद्यापही मंत्री म्हणून कायम आहेत. कोणत्या कारणामुळे त्यांना अटक करण्यात आलं आहे यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. आमचे सर्व जे बुजुर्ग नेते आहेत त्यांनी या सगळ्याबाबत चर्चा करुनच त्याबाबत निर्णय घेतला आहे. तरी देखील उद्या हायकोर्ट काय निर्णय देतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.'

'मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मुख्यमंत्री हे आज तरी नवाब मलिक यांचा राजीनामा स्वीकारायचा नाही या मताशी ठाम आहेत. आत्ताचा घडीला जो निर्णय आहे तो मी आपल्याला सांगितला आहे.'

'कोणाचा राजीनामा स्वीकाऱ्याचा किंवा नाही स्वीकाऱ्याचा याच निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा असतो. मागच्या वेळेस दोन मंत्र्यांचा राजीनामा स्वीकारण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. त्यासंबंधीची कारणं कदाचित वेगळी असतील. यावेळेस कारण वेगळं वाटलं त्यामुळे राजीनामा घेण्यात आला नाही.' असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

chief minister uddhav thackeray is adamant on his decision not to accept nawab maliks resignation said ajit pawar
राज्याचा अर्थसंकल्प 'या' दिवशी मांडणार, अजित पवारांनी दिली अत्यंत महत्त्वाची माहिती

'विरोधी पक्ष नेते चहापानाला उपस्थित राहिले असते तर...'

'आता उद्यापासून सुरु होत असलेल्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित चहापानाच्या कार्यक्रमाला आम्ही विरोधी पक्ष नेते सर्व विरोधी पक्षाचे प्रमुख यांना निमंत्रण दिलं होतं. परंतु त्यांनी आम्हाला पत्र पाठवलं आणि त्यात उल्लेख केला की, आम्ही चहापानाला उपस्थित राहू शकत नाही. त्यामुळे ते चहापानाला उपस्थित नव्हते.'

'आता विरोधी पक्ष नेते चहापानाला उपस्थित राहिले असते तर अधिवेशनाचं कामकाज अधिक प्रभावीपणे होण्याकरता किंवा तशी चर्चा झाली असती. परंतु तसं घडलं नाही. कधीपण चर्चेतून नेहमी काही ना काही चांगलं घडत असतं. आता मागच्या वेळेस तुम्ही पाहिलं असेल की, पाच दिवसाचं अधिवेशन होतं त्यावेळेस पाचही दिवस पूर्णपणे कामकाज म्हणजे जवळजवळ 24 बिलं आम्ही काढली.'

'एखाद्या बिलाचा अपवाद वगळता बाकी सगळी बिलं ही चर्चेतून पूर्णत्वाला नेण्याचं काम आमच्या सरकारने केलं. त्याच बरोबर पूर्वसंध्येला मंत्रिमंडळाची बैठक देखील झाली. मुख्यमंत्री हे व्हीसीद्वारे उपस्थित होते. त्यांनीही मार्गदर्शन केलं.' असं अजित पवार यावेळी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in