पिंपरी-चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या

तळेगाव-दाभाडे परिसरातली घटना, पोलीस तपास सुरु
पिंपरी-चिंचवड : अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्राने वार करत हत्या
मृत दशांतचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना सापडला

पिंपरी-चिंचवड शहरात वाढत जाणारी गुन्हेगारी ही पोलीसांसाठी चिंतेची बाब ठरली आहे. पिंपरी-चिंचवड शहरालगत असलेल्या तळेगाव दाभाडे परिसरात अकरावीत शिकणाऱ्या एका मुलाची धारदार शस्त्राने वार करत निर्घृणरित्या हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर स्थानिक भागांत भीतीचं वातावरण तयार झालं आहे.

जुन्या मुंबई-पुणे हायवे लगत असलेल्या नॅशनल हेवी कंपनीसमोर बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचं कळतंय. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दशांत परदेशी असं मृत तरुणाचं नाव आहे. तो एका खासगी कॉलेजमध्ये ११ वी कॉर्मसमध्ये शिकत होता.

मृत दशांतचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना सापडला
अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या मुलाचा खून करणाऱ्या आईला आणि तिच्या प्रियकराला अटक

घटनेची माहिती मिळताच तळेगाव-दाभाडे पोलिसांचं पथक घटनास्थळी पोहचलं. यावेळी दशांतचा मृतदेह त्या भागात रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. ज्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेशी संबंधित दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

काही दिवसांपूर्वी दशांतचा या दोन संशयितांशी वाद झाला होता असं कळतंय. त्यातूनच ही हत्या झाली असल्याचा पोलिसांना संशय आहे.

मृत दशांतचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पोलिसांना सापडला
पिंपरी-चिंचवड : कोयत्याचा धाक दाखवून दारुच्या दुकानातून ३५ हजाराची लूट, घटना सीसीटीव्हीत कैद

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in