साळवी-राऊतांमध्ये पुन्हा वादाची ठिणगी : रिफायनरीवरील शिवसेनेच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रत्नागिरी : कोकणातील बहुचर्चित बारसू-सोलगाव रिफायनरी प्रकल्पावरुन सध्या शिवसेनेमध्येच अंतर्गत संघर्ष सुरु आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्तीय समजल्या जाणाऱ्या खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी या दोन नेत्यांमध्ये रिफायनरी प्रकल्पावरुन पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे मागील दोन वर्षांपासून दोघांमध्ये सुरु असलेला हा वाद अद्यापही धुमसत आहे. आमदार राजन साळवी हे समर्थनाच्या भूमिकेवर ठाम आहेत, तर खासदार विनायक राऊत यांचा विरोधाचा सूर कायम आहे.

या रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना आमदार राजन साळवी म्हणाले, राजापूर तालुक्यामध्ये बारसू-सोलगाव येथे रिफायनरी प्रकल्प व्हावा अशी स्थानिक जनतेची मागणी आहे. काही जणांचा पाठिंबा, काही जणांचा विरोध असे वातावरण आहे. आम्ही सर्व शिवसेनेची मंडळी स्थानिक जनतेच्या पाठिशी उभे राहिलेलो आहोत. स्थानिक जनतेला प्रकल्प हवा असल्यामुळे स्थानिक आमदार म्हणून हा प्रकल्प व्हावा अशी माझी कालही भूमिका होती, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. कारण या प्रकल्पामुळे राजापूर तालुका आणि जिल्ह्यातील अनेक बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे, जिल्ह्याच्या कायापालट होणार आहे.

शिंदे गटाने शिवसेनेचं मध्यवर्ती कार्यालय नेलं टेंभी नाक्यावर; काय आहे प्रकरण?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तर विनायक राऊत म्हणाले, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी माझी चर्चा झालेली आहे. बारसू रिफायणरी बाबत आमची स्पष्ट भूमिका आहे. सरकारला एखादा प्रकल्प राबायचा असेल तर तुम्हाला पोलिसी बळावर किंवा दडपशाहीने तो राबवता येणार नाही. लोकांच्या घरादारावर नांगर फिरवून प्रकल्प राबवला जात असेल तर आम्ही निरपराध लोकांसोबत खंबीरपणे उभे आहोत. त्या लोकांचे म्हणणं ऐकून घ्या.

तुमचा जर प्रकल्प एवढा चांगला असेल तर तो लोकांना नीट समजावून सांगा. जर त्यांचे समाधान झाले तरच पुढे जा. आज ज्या पद्धतीने पोलिसी बळाचा वापर करुन रिफायनरी रेटण्याचा उद्योग सुरु झालेला आहे. त्यावर खऱ्या अर्थाने या राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांनी आपल्या कर्तव्याची परिपूर्ती करावी, असे मला त्यांना सांगायचे आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना तडीपार करायचे, त्यांच्यावर 307 चे गुन्हे दाखल करायचे, महिलांवर गुन्हे दाखल करायचे हे सहन केले जाणार नाही, असेही राऊत म्हणाले.

ADVERTISEMENT

‘युतीबाबत आमच्याशी चर्चा नाही;’ संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेच्या युतीवर काय म्हणाले जयंत पाटील?

ADVERTISEMENT

काय आहे नेमका रिफायनरीचा वाद?

स्थानिकांच्या विरोधाच्या मुद्द्यावरुन सुरुवातील शिवसेनेने जैतापूर अणुउर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला होता. त्यानंतर स्थानिक जनतेच्याच विरोधाचा मुद्दा पुढे करुन शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पालाही विरोध दर्शविला होता. कालांतराने हा प्रकल्प रद्द होवून तो राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आला आहे. मात्र सध्या बारसू-सोलगाव या ठिकाणीही प्रकल्पाबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहेत. काही स्थानिक या रिफायनरीच्या समर्थनार्थ आहेत तर काही विरोधात आहेत.

सद्यस्थितीत बारसू-धोपेश्वर-गोवळ भागातील स्थानिक शेतकरी व जमीन मालकांनी 3 हजार एकर जागेची संमत्तीपत्र जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा केली आहेत. तर तालुक्यातील 55 संघटनांसह सुमारे 125 गावांचे प्रकल्प समर्थनाचे ठराव शासनाकडे सादर करण्यात आलेले आहेत. राजापूर नगर परिषदेनेही रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाचा ठराव शासनाला पाठवण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT