Don’t Talk to me असं संसदेत सोनिया गांधी स्मृती इराणींना काय म्हणाल्या? नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या स्मृती इराणींना Don’t Talk to Me असं म्हणाल्या आहेत. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक वक्तव्य केलं. त्यानंतर संसदेत चांगलाच गदारोळ झाला. या दरम्यान सोनिया गांधींच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यातही वाद झाला. ज्यावेळी सोनिया गांधी या स्मृती इराणींना उद्देशून डोन्ट टॉक टू मी असं म्हणाल्या.

नेमकं काय घडलं? सोनिया गांधी स्मृती इराणींना काय म्हटल्या?

काँग्रेस खासदार अधीरंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत एक टीपण्णी केली. त्यानंतर संसदेत गदारोळ पाहण्यास मिळाला. यावेळी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी सोनिया गांधींनाही माफी मागण्यास सांगितलं. त्यावेळी या दोघींमध्ये वादही झाला. ज्यानंतर स्मृती इराणी यांना सोनिया गांधी डोन्ट टॉक टू मी अर्थात माझ्याशी बोलूही नका असं उद्देशून म्हणाल्या.

द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती नाही तर त्या राष्ट्रपत्नी आहेत असं अधीरंजन चौधरी यांनी म्हटलं. त्यानंतर भाजपने अधीररंजन चौधरी यांच्यावर आणि काँग्रेसवर कडाडून टीका केली. माझ्याकडून चूक झाली मी बोलून बसलो तसं मला बोलायचं नव्हतं असं अधीररंजन चौधरी यांनी म्हटलं. मात्र भाजपने या प्रकरणी गदारोळ केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

स्मृती इराणी अधीररंजन चौधरी यांना उद्देशून काय म्हणाल्या?

काँग्रेसची भूमिका आदिवासी, गरीब आणि महिलांच्या विरोधातली आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली देशाच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या महिलेवर अशा प्रकारे टीपण्णी करणं काँग्रेसला शोभतं का? महिलांचा अनादर करणं आणि त्याद्वारे भारताच्या राज्यघटनेला ठेच लागली आहे असंही स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे.

स्मृती इराणी यांच्या वक्तव्यानंतर हंगामा झाला. त्यानंतर लोकसभा स्थगित करण्यात आली. सोनिया गांधी सदनातून बाहेर जाऊ लागल्या. त्यावेळी सोनिया गांधी यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे खासदारांनी केली. यानंतर सोनिया गांधी पुन्हा जागेवर आल्या. त्या म्हणाल्या जे अधीर रंजन चौधरी बोलले त्याबाबत मी त्यांना माफी मागण्यास सांगितलं आहे. त्यांनी या प्रकरणात माफीही मागितली आहे. मग माझं नाव का घेतलं जातं आहे असा प्रश्न सोनिया गांधी यांनी विचारला.

ADVERTISEMENT

यानंतर सोनिया गांधी यांच्याजवळ स्मृती इराणी आल्या. त्या म्हणाल्या मी तुमची काय मदत करू शकते ते सांगा, मी तुमचं नाव घेतलं आहे. यावर सोनिया गांधी म्हणाल्या Don’t Talk to me. यानंतर सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात चांगलाच वाद झाला. दोन ते तीन मिनिटं या दोघींमध्ये वाद झाला. त्यानंतर दोन्ही पक्षांचे खासदार आले त्यांनी सोनिया गांधी आणि स्मृती इराणी यांना बाजूला केलं.

ADVERTISEMENT

काँग्रेस खासदार गीता कोडा म्हणाल्या लोकसभेचं कामकाज ४ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे. आम्ही सगळे चाललो होतो. मात्र भाजप खासदार ओरडू लागले, सोनिया गांधींचं नाव घेऊ लागले. त्यामुळे सोनिया गांधी परत आल्या. त्यांना हे जाणून घ्यायचं होतं की नेमकं काय घडलं? त्या हेदेखील म्हणाल्या की अधीर रंजन चौधरी यांनी माफी मागितली आहे तर मग हा सगळा हंगामा का? त्यावेळी भाजप खासदार सोनिया गांधी यांच्या राजीनाम्याची मागणी करू लागले. सोनिया गांधी यांच्याकडे अंगुलीनिर्देश करत ओरडू लागले.

स्मृती इराणी म्हणाल्या की या खूप बोलतात, ओरडतात. असंही गीता कोडा यांनी म्हटलं आहे. स्मृती इराणी जोरजोरात ओरडू लागल्या. सोनिया गांधींवर त्या चिडल्या. सोनिया गांधी यांच्यासोबत जे घडलं ते अयोग्य आहे असंही गीता कोडा यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT