यशवंत सिन्हांना पराभूत करत द्रौपदी मुर्मू बनल्या देशाच्या १५व्या राष्ट्रपती! २५ जुलैला शपथविधी

राष्ट्रपतीपदाची निवडणूक १८ जुलैला पार पडली, यामध्ये द्रौपदी मुर्मूंचा विजय निश्चित मानला जात होता
Draupadi Murmu's victory in the presidential election, swearing-in on 25 July
Draupadi Murmu's victory in the presidential election, swearing-in on 25 July

NDA च्या उमेदवार द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्या आहेत. UPA चे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा त्यांनी पराभव केला आहे. १८ जुलैला राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली. त्यानंतर यासाठीची मतमोजणी झाली आहे. आज झालेल्या मतमोजणीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत २५ जुलैला त्या देशाच्या राष्ट्रपती म्हणून शपथ घेतील. द्रौपदी मुर्मू यांच्या रूपाने देशाला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळणार आहेत.

द्रौपदी मुर्मू यांचा राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत दणदणीत विजय

संपूर्ण देशाचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांनी बाजी मारली आहे. द्रौपदी मुर्मू यांना ८१२ मतं मिळाली आहेत तर यशवंत सिन्हा ५२१ मतं मिळाली आहेत. राष्ट्रपती पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला असतील. द्रौपदी मुर्मू या २५ जुलैला शपथ घेतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपणार आहे.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

द्रौपदी मुर्मू या ओदिशातील आदिवासी नेत्या आहेत. ओदिशातील भाजप-बीजेडी युती सरकारमध्ये २००२-२००४ काळात त्या मंत्रीही होत्या. त्यांनी झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणूनही काम केलं आहे. द्रौपदी मुर्मू या ओदिशाच्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

ओदिशाच्या आदिवासी कुटुंबात २० जून १९५८ ला द्रौपदी मुर्मू यांचा जन्म झाला. सुरूवातीला त्यांनी शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यानंतर त्या राजकारणात सक्रिय झाल्या. १९९७ मद्ये रायरंगपूर नगरपंचायतीत त्या नगरसेवक म्हणून त्या विजयी झाल्या. २००० ते २००९ या कालावधीत त्या ओदिशा विधानसभेत आमदार होत्या. २०१५ मध्ये त्यांची झारखंडच्या राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झाली होती. पाठिंबा मिळावा म्हणून द्रौपदी मुर्मू आणि यशवंत सिन्हा या दोघांनीही देशभरात दौरे केले होते. मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्या आहेत. प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. त्यानंतर आता द्रौपदी मुर्मू या महिला राष्ट्रपती ठरल्या होत्या. २१ जुलैला म्हणजेच आज मतमोजणीला सुरूवात झाली तेव्हाच द्रौपदी मुर्मू आघाडीवर होत्य.

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत देशभरातल्या १७ खासदारांची मतं फुटली आहेत. या खासदारांनी एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या बाजूने मतदान केलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in