सायकलवरुन विधानसभेत पोहचले काँग्रेस आमदार, पण का..?
मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट सायकलवरुन मोर्चा काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला आहे. काँग्रेसने अशा अनोख्या पद्धतीने केलेलं आंदोलन हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेकदा असं पाहायला मिळतं की, अधिवेशनाच्या दिवशी विरोधी पक्षाचे आमदार हे आंदोलन करत असतात. पण आज सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. […]
ADVERTISEMENT

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी काँग्रेसच्या नेत्यांनी थेट सायकलवरुन मोर्चा काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला आहे. काँग्रेसने अशा अनोख्या पद्धतीने केलेलं आंदोलन हा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच चर्चेचा विषय ठरतो आहे. अनेकदा असं पाहायला मिळतं की, अधिवेशनाच्या दिवशी विरोधी पक्षाचे आमदार हे आंदोलन करत असतात. पण आज सत्ताधारी आमदारांनी आंदोलन केल्याचं चित्र पाहायला मिळतंय.
पाहा काँग्रेस आमदारांचं सायकल आंदोलन
पेट्रोल आणि डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने काँग्रेसच्या आमदारांनी सायकलवरुन रॅली काढत केंद्रातील भाजप सरकारचा विरोध केला. याबाबत बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नाना पटोले असं म्हणाले की, ‘केंद्र सरकारने लावलेल्या अन्यायकारक करांमुळे इंधनाचे दर गगनाला भिडले असून महागाई प्रचंड वाढली आहे. याचा निषेध म्हणून आज काँग्रेस पक्षाचे मंत्री व सर्व आमदार यांच्यासह राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल चालवत विधानभवनात जाऊन मोदी सरकार चा निषेध केला.’
ही बातमी नक्की पाहा: 8 वर्षापूर्वी सीतारमण पेट्रोल दरवाढीवर काय म्हणाल्या होत्या?