राज्यात भांडण, स्थानिक पातळीवर दिलजमाई; कल्याणमध्ये सत्तेसाठी सेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप हा सामना नेहमीच पहायला मिळतो आहे. दोन्ही गटांतील नेते एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत असतात. राज्याच्या राजकारणात प्रत्येक दिवशी आरोपींची राळ उडवली जात असली तरीही स्थानिक पातळीवर हे पक्ष सत्तेसाठी एकमेकांची साथ देताना दिसत आहेत. याचाच प्रत्यय ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे पंचायत समितीतील सभापतीपदाच्या निवडणुकीत पहायला मिळाला.

शिवसेना-भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांनी एकत्र येत सभापतीपदाची निवडणुक बिनविरोध करत सत्तेत वाटा घेतला आहे.

कल्याण पंचायत समितीत भाजपचे ५, राष्ट्रवादी काँग्रेस ३ आणि शिवसेना ४ असे पक्षीय बलाबल आहे. पक्षीय बलाबला नुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतीतल दोन पक्षांचं पंचायत समितीत वर्चस्व आहे. परंतू सुरुवातीला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी सभापती पदावर दावा केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सलग दोन वेळा भाजपाच्या मदतीने सत्ता स्थापन केली. या बदल्यात भाजपाला सभापती पद देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. तर त्यानंतरच्या काळात शिवसेनेने भाजपासोबत एकत्र येत सत्ता स्थापन करत सभापतीपदावर नाव कोरलं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मागील १७ महिन्यांच्या काळात शिवसेनच्या अनिता वाघचौरे सभापती होत्या. त्यांचा कार्यकाळ संपल्याने उर्वरित ८ महिन्यासाठी सभापतीपदाची निवडणूक घोषित झाली होती. त्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाने एकमताने भाजपच्या गळ्यात सभापती पदाची माळ घातली असून भाजपच्या सदस्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. बुधवारी रेश्मा भोईर यांनी पंचायत समिती सदस्याच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.

ADVERTISEMENT

पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी करोना काळात अनेक विकास कामे प्रलंबित असून मिळालेल्या काळात जास्तीत जास्त रखडलेली विकास कामे मार्गी लावण्याचा निर्धार असल्याचे त्यांनी सांगितले. परंतू या अनोख्या प्रयोगाची सध्या स्थानिक पातळीवर चांगलीच चर्चा सुरु आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT