Sharad Pawar: 'महाराष्ट्रात आम्हाला एवढ्या जागा मिळतील', पवारांनी आकडाच सांगून टाकला!

साहिल जोशी

ADVERTISEMENT

महाराष्ट्रात 50 टक्के जागा मिळतील, पवारांचा दावा
महाराष्ट्रात 50 टक्के जागा मिळतील, पवारांचा दावा
social share
google news

Sharad Pawar Mumbai Tak Exclusive Interview: साहिल जोशी / राजदीप सरदेसाई, बारामती: लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) मध्ये महाराष्ट्रात भाजपने 45 पारचा दावा सातत्याने केला आहे. पण दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबई Tak ला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत भाजपचा 45 पारचा दावा फेटाळत महाविकास आघाडीला राज्यात नेमक्या किती जागा मिळतील याबाबत थेट दावा केला आहे. (lok sabha election 2024 sharad pawar has claimed that mahavikas aghadi will get more than 50 percent seats in maharashtra)

ADVERTISEMENT

भाजप देशामध्ये 400 पारचा नार देत आहे तर महाराष्ट्रात महायुतीनेही 45 पारचा नारा दिला आहे. असं असताना शरद पवारांनी मात्र भाजपचा हा दावा फेटाळत महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकेल याबाबत भाष्य केलं आहे. 

मुंबई Tak च्या मुलाखतीत बोलताना शरद पवार यांनी दावा केला की, 'राज्यात 50 टक्के जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या तर मला आश्चर्य वाटणार नाही.' म्हणजेच शरद पवार यांनी थेट म्हटलं की, महाविकास आघाडीला राज्यात 24 जागा मिळू शकतात.. 

हे वाचलं का?

महाराष्ट्रात MVA ला किती जागा मिळतील?, पाहा शरद पवारांचं नेमकं काय उत्तर.. 

प्रश्न: बारामतीत सुप्रिया सुळे वि सुनेत्रा पवार आणि महाराष्ट्रात 48 जागा.. तुम्हाला काय वाटतं महाविकास आघाडीला किती जागा मिळतील? 

शरद पवार: मागच्या निवडणुकीत आम्हा सगळ्यांना मिळून 6 जागा मिळाल्या होत्या. आम्हाला 5 आणि काँग्रेसला 1 आणि 1 अपक्ष.. आज त्याच्यामध्ये तिप्पट तरी वाढ होईल. मला आश्चर्य वाटणार नाही की, आम्हाला 50 टक्के जागा मिळाल्या तर.. मिळाल्याचं आश्चर्य वाटणार नाही.. बारामती तर आहेच.. 

असं शरद पवार यांनी म्हटलं.. यावेळी त्यांनी बारामतीत सुप्रिया सुळे यांचाच विजय होईल असाही दावा केला आहे.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> ठाकरेंना नको होतं तेच झालं, 'MVA'तील पहिल्या बंडखोरीवर..

2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. ज्याचा दोन्ही पक्षांना फायदा झाला होता आणि त्याचे 40 हून अधिक खासदार निवडून आले होते. 

ADVERTISEMENT

मात्र, 2024 ची निवडणूक ही सर्वाथाने वेगळी आहे. कारण यावेळी निवडणुकीत प्रमुख 6 पक्ष आहेत. ज्यापैकी दोन पक्षात अत्यंत मोठी अशी फूट पडलेली आहे. त्यामुळे या दोन पक्षांमध्ये मतदारांची सहानुभूती नेमकी कोणाला मिळते हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. त्यावर लोकसभेचं बरचसं गणित अवलंबून असणार आहे.

2019 मध्ये शरद पवारांचा झंझावात अन्.. 

2019 साली लोकसभेत भाजपला देशात प्रचंड मोठं यश मिळालं होतं. त्यामुळे महाराष्ट्रात विधानसभेत देखील तसंच यश मिळेल असा अनेकांचा होरा होता. मात्र, त्यावेळी अवघ्या महाराष्ट्रात शरद पवार यांनी केलेल्या झंझावाती दौऱ्यामुळे भाजपला मोठा फटका बसला होता. त्यांचे 105 आमदारच त्यावेळी निवडून आले होते. त्यानंतर  झालेल्या एकूण राजकीय बदलामुळे महाराष्ट्राचं सगळं राजकारणच बदलून गेलं.

हे ही वाचा>>  शरद पवारांचा नवनीत राणांविरोधात 'सातारा पॅटर्न', मेसेज काय?

आता पुन्हा एकदा शरद पवार महाविकास आघाडी आणि त्यांच्या पक्षासाठी सातत्याने नवनव्या योजना आखत आहेत. त्यामुळे यंदा राज्यात महाविकास आघाडीला नेमक्या किती जागा मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT