कोरोना वाढवणार टेन्शन; XE व्हेरियंटबद्दल WHO ने व्यक्त केली चिंता

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या तीन लाटांचा मुकाबला करून महाराष्ट्रासह देशातील जनजीवन पूर्वपदावर आलेलं असतानाच आता आणखी नवा व्हेरियंट आढळून आल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेनं दिली आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट एक्सई चा संसर्गाचा वेग हा ओमिक्रॉनच्या BA.2 पेक्षा १० टक्क्याने अधिक असण्याचा अंदाज आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आरोग्य संघटनेनं आपल्या अलिकडेच्याच अहवालात हे म्हटलं आहे.

रिपोर्टनुसार BA.2 व्हेरियंटच्या तुलनेत एक्सई व्हेरियंटच्या कम्युनिटी वाढीचा वेग १० टक्के जास्त असल्याचं संकेत मिळाले आहेत. याची खात्री करण्यासाठी आणखी आकडेवारीची गरज असल्याचंही आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. BA.2 हा व्हेरियंट जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे, कारण व्हेरियंटच्या साखळी संख्या ८६ टक्के असल्याची माहिती आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

XE व्हेरियंट सर्वात आधी ब्रिटनमध्ये आढळून आला. १९ जानेवारी रोजी हा व्हेरियंट पहिल्यांदा समोर आला. त्यानंतर ब्रिटनमध्ये ६०० पेक्षा अधिक रुग्णांमध्ये हा व्हेरियंट आढळून आला आहे. ब्रिटनच्या आरोग्य सुरक्षा एजन्सीचे मुख्य आरोग्य सल्लागार सुझैन हॉपकिंग्ज या व्हेरियंटबद्दल बोलताना म्हणाले की, या व्हेरियंटच्या संसर्गाचा वेग किंवा तो किती धोकायदायक आहे. त्याचबरोबर कोरोना लस यावर प्रभावी आहे का? याबद्दल अद्याप पुरेस पुरावे नाहीत, अशी माहिती त्यांनी दिली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जागतिक आरोग्य संघटनेनं आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, एक्सई सारखे रिकॉम्बिनंट व्हेरियंटमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर लक्ष ठेवलं जाईल आणि याच्याशी संबंधित माहिती समोर आल्यानंतर वेळोवेळी याबद्दलची माहिती दिली जाईल. एक्सई व्हेरियंट शिवाय जागतिक आरोग्य संघटना एक्सडी वरही नजर ठेवून आहे. हा व्हेरियंट डेल्टा आणि ओमिक्रॉनचं हायब्रीड प्रकार आहे. या व्हेरियंटचा संसर्ग झालेले रुग्ण फ्रान्स, डेन्मार्क आणि बेल्जियमध्ये आढळून आले आहेत.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार एक्सडी हा जास्त संसर्गजन्य वा धोकादायक असल्याचं दिसून आलेलं नाही. त्यामुळे या व्हेरियंटबद्दल काळजी करण्याची गरज नसल्याचं आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT