कोव्हिडचा ST ला फटका! दोन वर्षात सात हजार कोटींचा संचित तोटा

किरण तारे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सध्या राज्यभरात गाजतो आहे तो एसटीचा संप. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा संप मिटवण्यासाठी सरकारने आज पगारवाढीचा तोडगा काढला. तरीही एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांची भूमिका गुरूवारी स्पष्ट करणार आहेत. मात्र कोव्हिडच्या काळात एसटीला मोठा फटका बसला आहे. एसटीला गेल्या दोन वर्षांमध्ये खूप मोठं नुकसान झालं आहे. आपण जाणून घेऊ नेमकं काय घडलं आहे मागच्या दोन वर्षात?

मागच्या दोन वर्षात एसटीला कोव्हिडचा फटका!

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

महाविकास आघाडी सरकार येण्यापूर्वी एसटीचा संचित तोटा 5 हजार कोटी रूपयांचा होता. गेल्या दोन वर्षात त्या थोडी-थोडकी नाही सात हजार कोटींची भर पडली आहे. त्यामुळे सध्या एसटीचा संचित तोटा 12 हजार कोटी रूपये इतका झाला आहे. लॉकडाऊनच्या काळात एसटी वर्षभर पूर्णपणे बंद होती. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत गेला.

एसटी कर्मचारी आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनावर 360 कोटी रूपये खर्च करते. राज्य सरकारला 17 टक्के रोड टॅक्स द्यावा लागतो. ही रक्कम साधारण 150 कोटींच्या घरात आहे. ती राज्य सरकार काही दिवसांनी एसटी महामंडळाला परत करत असते. एसटीच्या राज्यभरातील जमिनींची किंमत साधारण पाच हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. त्यामुळे जमिनी विकून एसटीचा सर्व तोटा भरून काढणे शक्य होणार नाही, असा सरकारचा दावा आहे.

ADVERTISEMENT

ST Strike: सरकारने निर्णयही जाहीर केला पण ST चा संप मिटला की नाही? हे तर जाणून घ्या

ADVERTISEMENT

लॉकडाऊनच्या काळात काय झालं?

लॉक डाऊनच्या काळात खासगी बसची देखभाल करून, एसटीच्या पेट्रोल पंपांवर इतर नागरिकांना इंधन भरायला परवानगी देऊन तसेच काही अन्य देखभालीची कामं करून एसटीने उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात फारसे यश आले नाही.एसटीच्या जमिनींचा व्यवसायिक वापर करावा. त्या जमिनीची मालकी सरकारकडेच राहावी. मात्र, त्यातून एसटी महामंडळाला दर महिन्याला काही ठराविक रक्कम मिळावी. त्यातून किमान कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा खर्च भागवला जाईल, अशा प्रकारचं धोरण तयार होत आहे.

अनिल परब यांनी काय केली घोषणा?

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करावं यासाठी मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दरम्यान, या संपाबाबत आता तोडगा निघाल्याचं दिसतं आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी बुधवार (24 नोव्हेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. एसटी कामगारांच्या पगारवाढीची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे.

दरम्यान, अनिल परब यांच्या मते जी पगारवाढ देण्यात आली आहे ती एसटीच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी वाढ आहे. मात्र, असं असलं तरीही कर्मचाऱ्यांची जी विलिनीकरणाची मागणी आहे ती अद्याप तरी मान्य करण्यात आलेली आहे. विलिनीकरणाचा निर्णय हा समितीसमोर आहे. ज्यासाठी 12 आठवड्यांचा वेळ लागणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी तोवर थांबू नये. त्यांनी तात्काळ कामावर रुजू व्हावं असं अनिल परब यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT