Shiv Sena: ‘इम्रान खान यांचे तोंड आंबटच राहिल’, ‘सामना’तून काश्मीरप्रश्नी तुफान टीका
मुंबई: ‘अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो.’ असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्यानंतर आता त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून इम्रान खान यांच्यावर तोफ डागली आहे. ‘अमेरिका जागतिक महासत्ता वगैरे असेलही, पण म्हणून कश्मीरबाबत मध्यस्थी करण्याचा अधिकार तिला आहे असे […]
ADVERTISEMENT

मुंबई: ‘अमेरिकेची इच्छा असेल आणि त्यांनी संकल्प केला तर कश्मीर प्रश्न सुटू शकतो.’ असं वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केल्यानंतर आता त्यांच्या याच वक्तव्यावर शिवसेनेने जोरदार टीका केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून इम्रान खान यांच्यावर तोफ डागली आहे.
‘अमेरिका जागतिक महासत्ता वगैरे असेलही, पण म्हणून कश्मीरबाबत मध्यस्थी करण्याचा अधिकार तिला आहे असे होत नाही.’ असंही यावेळी अग्रलेखात म्हटलं आहे.
पाहा सामनाच्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे:
-
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना अचानक कश्मीर प्रश्नाची उबळ आली आहे. कश्मीर प्रश्न सुटला तर अण्वस्त्रांची गरजच उरणार नाही, असा साक्षात्कार इम्रान यांना झाला आहे. अर्थात, त्यातही त्यांचे वाकडे शेपूट वळवळलेच आहे.