दापोली तिहेरी हत्याकांड : हत्या केल्यानंतर तिन्ही महिलांना दिलं पेटवून; पैशासाठी भयंकर कृत्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तीन वयोवृद्ध महिलांचे जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली होती. तिन्ही महिलांचा जळून मृत्यू झाल्याचं बोललं जात होतं. मात्र, पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आणि घटनेचं गुढ उलगडलं. कर्जबाजारी झालेल्या रामचंद्र शिंदेने पैशासाठी तिन्ही महिलांची हत्या केली आणि मृतदेह पेटवून दिल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं. या तिहेरी हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

दापोली तालुक्यातील तिहेरी हत्याकांडातील गुन्हेगाराचा छडा लागला असून, वणौशी खोतवाडीतील रामचंद्र शिंदे व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. रामचंद्र शिंदे याने तीन वयोवृद्ध महिलांचा खून करून त्यांच्या अंगावरील १ लाख ६२ हजार रुपये किमतीचे दागिने व घरातील रोख रक्कम चोरून नेल्याचंही उघड झालं आहे.

Crime: पत्नीचेच अश्लील फोटो ऑनलाइन शेअर करत होता पती, नेमकं प्रकरण काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

१३ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. या तिहेरी हत्याकांडाबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी शनिवारी (२२ जानेवारी) दापोलीत पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

आरोपीने तीन वृद्ध महिलांचा खून करून पुरावे नष्ट केले. घटनास्थळी कोणताही पुरावा आढळून न आल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक गर्ग, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई यांनी वणौशी येथे तळ ठोकून उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद, रत्नागिरीचे पोलीस निरीक्षक, ६ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३ पोलीस निरीक्षक यांची ५ पथके तयार केली.

ADVERTISEMENT

मुंबई : बोलायचं आहे म्हणून नेलं अन् चौघांनी केला सामूहिक बलात्कार; गोवंडीतील धक्कादायक घटना

ADVERTISEMENT

हत्या करण्यात आलेल्या सत्यवती पाटणे या गावातील गरजू लोकांना पैसे द्यायच्या. रामचंद्र शिंदे (वय ५३) यानेही त्यांच्याकडून पैसे घेतले होते. ते त्याने परत दिले नव्हते. तो आर्थिक अडचणीत होता. त्यातूनच त्याने १३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत तीन वृद्ध महिलांचा खून केला व त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच घरातील पैसे लंपास केले.

संशयित रामचंद्र शिंदे याने सत्यवती पाटणे, पार्वती पाटणे, इंदुबाई पाटणे यांचा धारधार शस्त्राने खून करून त्यांना रॉकेल ओतून त्यांना जाळण्याच्या प्रयत्न केला.

साताऱ्यात विवाहितेचा छळ करून खून, सासरच्यांविरोधात गुन्हा दाखल

रामचंद्र शिंदे हा वणौशी तर्फे नातू या गावचा रहिवासी असून, मुंबई येथे राहतो. पोलिसांनी रामचंद्र शिंदे याच्या हालचालींवर नजर ठेवली. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. पोलिसी खाक्या दाखवताच शिंदेने खुन केल्याची कबूली दिली, अशी माहिती पोलीस अधीक्षक गर्ग यांनी दिली.

दरम्यान, या प्रकरणाच्या तपासात सहभागी असलेल्या सर्व पोलीस कर्मचारी, डॉग स्क्वॉड, मोबाईल फोरेन्सिक युनिटचे तज्ञ यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी २५ हजार रुपयांचे बक्षिस देऊन गौरव केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT