प्रियंका गांधी यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतलं ताब्यात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

उत्तर प्रदेशातील आग्रा या ठिकाणी असलेल्या जगदिशपुरा भागात पोलीस कोठडीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी जात होत्या त्यावेळी त्यांना ताब्यात घेण्यात आलं. लखनऊ-आग्रा एक्स्प्रेस वे वर त्यांना रोखण्यात आलं. त्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. जगदिशपुरा भागात कलम 144 लावण्यात आलं आहे. हे जमावबंदीचं कलम आहे त्यामुळे आम्ही त्यांना रोखलं अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रियंका गांधी यांचं ट्विट काय आहे?

‘अरूण वाल्मिकी यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाला आहे. त्यांच्या कुटुंबीयांना न्याय हवा आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊ इच्छिते. त्याबद्दल यूपी सरकार का घाबरतं आहे? मला तिथे जाण्यापासून का रोखलं जातं आहे? आज वाल्मिकी जयंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गौतम बुद्धांचे उपदेश देतात. मात्र इथे भाजपचे लोक त्यांचे उपदेश धुडकावून लावत आहेत’ असं ट्विट त्यांनी भेटीसाठी जात असताना केलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

आग्रा येथील जगदिशपुरा पोलीस ठाण्यातून 25 लाख रूपये चोरीला गेले. या प्रकरणी ज्या अरूण वाल्मिकीला ताब्यात घेण्यात आलं होतं त्याचा तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली की आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करत होतो. त्यावेळी त्याची तब्बेत बिघडली आणि नंतर त्याचा मृत्यू झाला. अरूण नावाच्या व्यक्तीच्या घराचीही तपासणी आम्ही केली. त्यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी आम्ही सुरू केली होती. त्यावेळी त्याची तब्बेत बिघडली. त्यामुळे आम्ही त्याला रूग्णालयात दाखल केलं. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं असं पोलिसांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

अरूण वाल्मिकी हा जगदिशपुरा पोलीस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता. पोलीस ठाण्यात ज्या ठिकाणी जप्त केलेल्या वस्तू आणि पैसे ठेवलेले असतात त्या खोलीतून अरूण वाल्मिकीने 25 लाख रूपये चोरल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी सुरू केली होती.

ADVERTISEMENT

माध्यमांना प्रतिक्रिया देताना प्रियंका गांधी म्हणाल्या की, ‘ ते म्हणातात मी आग्रा येथे जाऊ शकत नाही. मी जिथे मी जाते तिथे ते मला रोखतात. मी एका रेस्टॉरंटमध्ये बसून रहावं का? केवळ ते त्यांच्या राजकारणासाठी सोयीचं ठरेल म्हणून? मला त्यांची भेट घ्यायची आहे, यामध्ये एवढी काय मोठी गोष्ट आहे?’

    follow whatsapp

    ADVERTISEMENT