भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीत मोठा बदल, नितीन गडकरींना डच्चू तर देवेंद्र फडणवीसांची एन्ट्री

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पक्षाच्या संसदीय समितीत डच्चू देण्यात आला आहे, तर देवेंद्र फडणवीसांना संसदीय समितीमध्ये घेण्यात आले आहे. गडकरींशिवाय मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनाही संसदीय समितीतून हटवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही बाहेर फेकले गेले आहेत.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांना बोर्डावरुन हटवण्यात आले आहे, तर बीएस येडियुरप्पा, सुधा यादव, इक्बाल सिंग लालपुरा, सर्बानंद सोनोवाल, के. लक्ष्मण यांचा संसदीय समितीत समावेश करण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे नितीन गडकरींना काढून देवेंद्र फडणवीसांना संधी दिल्याबद्दल राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

हे आहेत नवीन संसदीय समितीचे सदस्य

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

ADVERTISEMENT

अमित शाह

ADVERTISEMENT

बीएस येडियुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के.लक्ष्मण

इक्बाल सिंग लालपुरा

सुधा यादव

बीएल संतोष (सचिव)

यासोबतच भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीचीही घोषणा करण्यात आली आहे. या समितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि ओम माथूर यांना नव्याने स्थान देण्यात आले आहे. याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही या समितीत स्थान मिळालेले नाही.

केंद्रीय निवडणूक समितीचे सदस्य

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित शाह

बीएस येडियुरप्पा

सर्बानंद सोनोवाल

के लक्ष्मण

इकबाल सिंग लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जातिय

भूपेंद्र यादव

देवेंद्र फडणवीस

बीएल संतोष (सचिव)

व्ही श्रीनिवास (पदाधिकारी)

या दोन्ही नव्या याद्यांचे राजकीय महत्त्व समजू लागले आहे. अलीकडेच महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेच्या शिंदे गटाला सोबत घेऊन सरकार स्थापन केले आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करण्यात आले आहे, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदावर समाधान मानावे लागले होते. यापूर्वी फडणवीस मुख्यमंत्री होते. फडणवीस यांनाही उपमुख्यमंत्री व्हायचे नव्हते, पण अचानक त्यांना केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाने शपथ घ्यावी लागली. आता महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा चेहरा असलेल्या नितीन गडकरी यांना संसदीय समिती आणि निवडणूक समितीतून हटवण्यात आले असून देवेंद्र फडणवीस यांना संधी देण्यात आली आहे.

दुसरीकडे भाजपने कर्नाटकच्या राजकारणाचे समीकरण सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने कर्नाटकमध्ये आपले नेतृत्व बदलले होते, असे मानले जात होते की ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांना कर्नाटकच्या राजकारणात झुकते माप मिळत होते. अशा स्थितीत त्यांना केंद्रीय समितीमध्ये आणून भाजपने 2023 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणाचे समिकरण जुळवण्याचा प्रयत्न केला आहे.

शाहनवाज हुसेन यांना दुहेरी फटका

शाहनवाझ हुसेन हे भाजपच्या केंद्रीय राजकारणाचा एक भाग असायचे. 2020 मध्ये, जेव्हा भाजपने बिहारमध्ये JDU सोबत सरकार स्थापन केले तेव्हा शाहनवाज हुसैन यांना दिल्लीहून पाटण्याला पाठवण्यात आले आणि ते मंत्रिमंडळात मंत्री झाले. आता जेडीयूने भाजपशी संबंध तोडून आरजेडीसोबत सरकार स्थापन केले, त्यानंतर भाजपच्या मंत्र्यांनाही आपल्या जागा गमवाव्या लागल्या. मंत्रिपदाच्या खुर्चीपाठोपाठ आता शाहनवाज हुसेन हे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीतूनही फेकले गेले आहेत.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT