मुख्यमंत्र्यांजवळ जे टोमणे बॉम्ब आहेत त्याच्यापेक्षा खतरनाक बॉम्बच उरलेला नाही: फडणवीस
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना अनेक मुद्द्यांवरुन भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना बरेच टोमणे लगावले. याच मुद्द्यावरुन मीडिया स्टँडवर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील मिश्किल शैलीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. याचवेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री हे नवाब मलिकांची पाठराखण करत असल्याच्या मुद्द्यावरुन खरपूस समाचार घेतला. ‘मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना अनेक मुद्द्यांवरुन भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना बरेच टोमणे लगावले. याच मुद्द्यावरुन मीडिया स्टँडवर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील मिश्किल शैलीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
याचवेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री हे नवाब मलिकांची पाठराखण करत असल्याच्या मुद्द्यावरुन खरपूस समाचार घेतला. ‘मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत म्हणजे या सत्तेत ते पुरते मुरले आहेत.’ असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. पाहा माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले:
‘बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत’
‘मला असं वाटतं की, बरं झालं की, आतापर्यंत मुख्यमंत्री चूप होते तर आम्हालाही असं वाटत होतं की, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती धग शिल्लक आहे की, जी मुंबईच्या अपराध्यांच्या विरोधात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती पण आज हे स्पष्ट झालं की, मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत म्हणजे या सत्तेत ते पुरते मुरले आहेत.’ अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.