मुलगा होत नसल्यामुळे पत्नीवर रॉकेल टाकून पेटवलं, आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुलगा होत नसल्याच्या कारणावरुन पत्नीला रॉकेट टाकून पेटवून देणाऱ्या पतीला कोल्हापूर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याचसोबत न्यायालयाने आरोपी पतीला १० हजारांचा दंड आणि गुन्ह्यात आपल्या मुलाला साथ देणाऱ्या आई-वडीलांनाही दोन महिने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.

२०१४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव येथे ही घटना घडली होती. या खटल्याची सुनावणी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात सत्र न्यायाधीश एस.आर.पाटील यांच्यासमोर सुरु होती. या प्रकरणात सुनावणी करताना न्यायालयाने आरोपी पती अल्ताफला दोषी ठरवत जन्मठेप आणि १० हजारांचा दंड ठोठावला. तसेच पत्नीला जाळण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या मुलाच्या आई-वडीलांनाही दोन महिन्याच्या सक्तमजुरीची शिक्षा कोर्टाने सुनावली.

करवीर तालुक्यातील उचगाव येथे दबडे कॉलनीत अल्ताफ चमनशेख हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. अल्ताफला तीन मुली होत्या. मुलगा होत नसल्यामुळे अल्ताफ आपली पत्नी शाईस्ताचा नेहमी छळ करायचा. ३० डिसेंबर २०१३ रोजी अल्ताफचे आई-वडील त्याच्या घरी राहण्यासाठी आले असता त्यांनी मुलगा होत नाही म्हणून पत्नीला मारण्यासाठी अल्ताफला भडकावलं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा आपल्या आईला रॉकेल टाकून जाळताना प्रकार शाईस्ताच्या मुलीने डोळ्यांनी पाहिला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

या घटनेत जवळपास ९६ टक्के भाजलेल्या शाईस्ताना उपचारादरम्यान मृत्यू झाला. परंतू मृत्यूआधी पोलिसांनी तिचा घेतलेला जबाब आणि महत्वाच्या साक्षीदारांच्या तपासणीनंतर जिल्हा न्यायालयाने आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT