ऐन दिवाळीत मुसळधार पावसाने कोकण-पुण्याला झोडपलं, शेतकरी-व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान
सिंधुदुर्ग: दिवाळीत देखील पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पडत असणाऱ्या पावसाने हाहाकार उडवला आहे. गेले तीन ते चार तास या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे इथल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून […]
ADVERTISEMENT

सिंधुदुर्ग: दिवाळीत देखील पावसाच्या जोरदार सरी बरसतील असा हवामान खात्याने दिलेला अंदाज खरा ठरला आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल संध्याकाळपासून पडत असणाऱ्या पावसाने हाहाकार उडवला आहे. गेले तीन ते चार तास या पावसाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाणादाण उडवून दिली आहे. त्यामुळे इथल्या भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
दिवाळीच्या पूर्वसंध्येला काल रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बऱ्याच भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. पावसाचा सर्वात मोठा फटका माणगाव खोऱ्यातील तब्बल 26 गावांना बसला आहे. माणगाव, साळगाव, आकेरी, नानेली, वाडोस, कालेली, वसोली, शिवापूर, निळेली या भागांना मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांनी आपले पिकलेले भात दोन-चार दिवसापूर्वी कापून ठेवलेले होते. पण आता हा कापलेला भात पाण्यात बुडून गेला आहे. तर काही ठिकाणी सतत पाण्याखाली भात गेल्याने त्याल कोंब यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर जिल्ह्यात गडगडाट मुसळधार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गात देखील चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. दुपारीच जोरदार गडगडाटासह पाऊस सुरू झाल्याने बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पहायला मिळत होता. लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर पाऊस पडल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे.