पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हातात दोन घड्याळं का घालतात माहित आहे का?

आदित्य ठाकरे यांनीच दिलं या प्रश्नाचं उत्तर
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हातात दोन घड्याळं का घालतात माहित आहे का?

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे ठाकरे घराण्यातले पहिले आमदार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याही आधी ते आमदार झाले. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी निवडणूक लढवली होती. ते निवडणुकीला उभं राहिले आणि निवडूनही आले. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात त्यांना पर्यावरण मंत्री हे पद मिळालं. ते चांगलं काम करत असल्याची पोचपावती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही काहीवेळा दिली आहे. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही त्यांचं कौतुक केलं होतं.

सध्या अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन विविध कारणांनी गाजतं आहे. अशात चर्चा सुरू आहे ती आदित्य ठाकरे यांच्या हातात असलेल्या दोन घड्याळांची. आदित्य ठाकरेंचा एक फोटो समोर आला होता. त्यामध्ये त्यांनी दोन घड्याळं घातल्याचं दिसून येतं आहे. यानंतर मुंबई तकने त्यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी याबद्दलचं कारण सांगितलं.

काय म्हणाले आहेत आदित्य ठाकरे?

'होय मी दोन घड्याळं वापरतो. त्यातलं एक माझं फिटबीट आहे. मी किती चाललो ते पाहण्यासाठी मी ते वापरतो. दुसरं घड्याळ वेळ पाहण्यासाठी आहे. लवकरच नवं घड्याळ घेणार आहे. मी माझं फिटबिट मी ट्रेडमिलवरही वापरतो. तेच घड्याळ आता मी बदलणार आहे.' असंही आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

आदित्य ठाकरेंनी दोन घड्याळं घातल्याची चर्चा अधिवेशनातही झाली होती. विधीमंडळ आवारात तर काही लोक अशीही चर्चा करत होते की आदित्य ठाकरेंच्या हातातलं एक घड्याळ राष्ट्रवादी काँग्रेसचं आहे. राष्ट्रवादी कांग्रेसचं पक्षचिन्ह दहा वाजून दहा मिनिटं वाजलेलं घड्याळ आहे. त्यावरून ही चर्चा होत होती. तसंच आदित्य ठाकरे दोन घड्याळं का घालत असतील? यावरही चर्चा रंगली होती. सोशल मीडियावरही काही युजर्स हा प्रश्न विचारत होते. त्यामुळेच मुंबई तकने हा प्रश्न खुद्द आदित्य ठाकरेंनाच विचारला.

पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरे हे दोन घड्याळं वापरतात. त्यांनी याबाबत स्वतःच माहिती दिली असून लवकरच नवं फिटबिट विकत घेणार असल्याचंही म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in