औरंगाबादमधे नर्सवर डॉक्टरकडून वारंवार बलात्कार, गर्भपात केल्यानंतरही अत्याचार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

औरंगाबादमधील गारखेडा भागात असलेल्या एका प्रसिद्ध रूग्णालयात काम करत असताना 25 वर्षाच्या आरएमओ डॉक्टराने एका नर्सवर बळजबरीने अत्याचार केला. त्यातून नर्सला दिवस गेले. डॉक्टरने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, विनासंमती तिचा गर्भपात केला. या डॉक्टरच्या तीन मित्रांनीही या नर्सचा विनयभंग केला. दामिनी पथकाने केलेल्या मदतीनंतर मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वर्धा: 17 वर्षीय मुलाकडून बलात्कार, 13 वर्षीय मुलगी गरोदर; गर्भपात करणाऱ्या महिला डॉक्टरला अटक

आरोपींमध्ये डॉ. संजय प्रसाद देशमुख, रेस्तराँचा मालक दीपक पाटील, मेडिकल दुकान चालवणारा सचिन शिंदे यांच्यासह आणखी एकाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 25 वर्षांची पीडिता आणि आरोपी डॉक्टर हे हॉस्पिटलमध्ये काम करतात. संजय देशमुखने नोव्हेंबर 2021 पासून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर पडेगाव येथील फ्लॅटवर नेऊन आणि अन्य ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यानंतर ही नर्स गरोदर राहिली. डॉक्टरने तिला गोळ्या देऊन तिची संमती न घेता तिचा गर्भपात केला. यामुळे पीडितेला प्रचंड वेदना झाल्या. हे सांगण्यासाठी ती डॉक्टर संजय देशमुखकडे गेली. त्याने तिला मुकुंदवाडी भागात असलेल्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेलं आणि तिथेही त्या परिस्थितीतही तिच्यावर बलात्कार केला. यानंतर डॉ. प्रसाद देशमुखचा मावस भाऊ असलेल्या दीपक पाटील यानेही तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका करून घेत पीडिता तिथून बाहेर पडली. डॉक्टरचा मित्र सचिन शिंदे आणि त्याचा अनोळखी मित्र या दोघांनीही तिचा विनयभंग केला.

भाडे दिले नाही म्हणून रिक्षाचालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पुण्यातली खळबळजनक घटना

ADVERTISEMENT

पीडिता सिडको बसस्थानकावर आली तेव्हा तिची प्रकृती खालवली होती. यासंदर्भातली माहिती दामिनी पथकाला मिळाली. त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे गेलं आणि सगळा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी आता उपनिरीक्षक बागूल हे तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

Crime: चर्चचा पाद्री निघाला विकृत नराधम, अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पत्नी करायची व्हीडिओ शूट

पीडित मुलगी जेव्हा बस स्थानकात येऊन बसली होती तेव्हा तिला वेदना असह्य होत होत्या. तिची अवस्था सुरक्षा रक्षकाने दामिनी पथकाला कळवली. दामिनी पथकाच्या प्रमुख उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, हवालदार लता जाधव, निर्मला निंभोरे, मनिषा बनसोडे, गिरीजा आंधळे यांच्या पथकाने येऊन तिची विचारपूस केली आणि तिला पोलीस ठाण्यात नेलं तिथे डॉक्टरविरोधात आणि इतरांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉक्टर या पेशाला काळीमा फासणारं कृत्यच या डॉक्टरने केलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT