महाराष्ट्रात सरकारचं अस्तित्व आहे का? फडणवीसांचा खोचक प्रश्न

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आज महाराष्ट्रावर विश्वासार्हतेचं संकट उभं राहिलं आहे. महाराष्ट्र देशातील सर्वाधिक समृद्ध, सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेलं राज्य. आज या राज्यात या सरकार कुठे आहे? हे विचारण्याची वेळ आली आहे असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आज भाजपच्या कार्यकारिणीत केलं.

एक मुख्यमंत्री आहेत, पण त्यांना कुणी मुख्यमंत्री मानायला तयार नाही. प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री मानतो आहे. आपल्या स्वतःच्या पलिकडे पाहण्यास तयार नाही. महाराष्ट्रातली जनता होरपळते आहे मात्र जनतेकडे कुणाला पाहण्यास वेळ नाही. कुणी राज्य म्हणून विचार करत नाही, कुणी समस्या पाहात नाही. जनतेचे हाल होत आहेत. जनता या सगळ्यांमुळे भरडली जाते आहे. खरं म्हणजे, पाच वर्षे आपलं सरकार होतं. त्या काळात कशावर चर्चा व्हायची? समृद्धी महामार्ग, मेट्रो, जलयुक्त शिवार, शेतकऱ्यांना मदत, डिजिटल इंडिया, औद्योगिकीकरण यावर चर्चा होत होती.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज परिस्थिती काय आहे? आज या सरकारमध्ये चर्चा कसली होते आहे? गांजा, हर्बल तंबाखू, सीबीडी स्मोक, वसुली, स्थगिती, बलात्कार, दंगली, खंडणी हे विषय आता आहेत. या सरकारच्या काळात दुराचार, अनाचार आणि भ्रष्टाचार पाहण्यास मिळतो आहे त्याबद्दल माझा दावा आहे की महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात भ्रष्ट सरकार आज घडीला आहे. आज ज्या प्रकारे वसुली चालली आहे, ते माजी गृहमंत्री तुरुंगात आहेत तिथपर्यंत सीमित नाही. एक वाझे आपण पाहिला, पण प्रत्येक विभागात एक वाझे आहे. हे सरकार सामान्यांसाठी नाही ते कायद्याचं राज्याचं नाही काय ते द्या त्याचं राज्य आहे. एक एक आकडा पाहिला तर थक्क व्हायला होईल असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आम्हाला कुणालाही घाबरण्याचं काम नाही. आमच्याकडे इनामी नाही आणि बेनामीही नाही. आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही. जेव्हा वर्षातून बाहेर पडलो. तेव्हा चार महिने भाड्याच्या घरात राहिलो. स्वत:चं घर नव्हतं. त्यामुळे घाबरण्याचं काम नाही. हे भ्रष्टाचारी सरकार आहे. थेट लढाई आहे. त्यामुळे आपण नाही लढलो तर आपल्याला काळ माफ करणार नाही, असंही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT