डोंबिवली : संपत्तीच्या वादातून दोन भावांनी केली चुलत भावाची हत्या

मानपाडा पोलिसांनी एका भावाला झारखंडवरुन केली अटक
डोंबिवली : संपत्तीच्या वादातून दोन भावांनी केली चुलत भावाची हत्या

डोंबिवली जवळील गोळवली येथे संपत्तीच्या वादातून महतो कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता. या वादातून कालू कुमार आणि लालू कुमार या दोन भावांनी आपलाच चुलत भाऊ पुरण महतोची हत्या केली आहे.

कालू आणि लालू यांनी आपल्या चुलत भावाला घरी जेवण्यासाठी बोलावलं होतं. दरम्यान दोन्ही भावांनी पुरणला दारु पाजून बेदम मारहाण केली आणि दर्शन पाटील चाळीजवळ सोडून दिलं. मानपाडा पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी पुरणला रुग्णालयात दाखल केलं. परंतू तोपर्यंत पुरणचं निधन झालं होतं.

यानंतर मानपाडा पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी तपासाची चक्र फिरवत म्हारळ, शहाड, अंकलेश्वर, भरूच, भुसावळ या ठिकाणी शोध सुरु केला. मात्र दरम्यानच्या काळात आरोपी डोंबिवली सोडून झारखंडला जाण्यात यशस्वी झाले होते. मानपाडा पोलिसांना याबद्दलची माहिती मिळताच त्यांनी झारखंडमध्ये जाऊन तपासाला सुरुवात केली.

दरम्यान दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडू नये यासाठी त्यांच्यावर झारखंडमध्ये दगडफेकही करण्यात आली होती. परंतू सुदैवाने यात कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला दुखापत झाली नाही. कारवाईला विरोध होत असतानाही पोलिसांनी नेटाने कालू कुमारला अटक करण्यात यश मिळवलं, या गडबडीत लालू कुमार हा पळून जाण्यात यशस्वी ठरला आहे. पोलिसांनी कालू कुमारला न्यायालयासमोर हजर केलं असून त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

डोंबिवली : संपत्तीच्या वादातून दोन भावांनी केली चुलत भावाची हत्या
अंबरनाथमध्ये दुकान मालकाचं भयंकर कृत्य! अल्पवयीन मुलावर केला अनैसर्गिक अत्याचार

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in