डोंबिवली : शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकरसह दोघांना पोलिसांनी केली अटक

कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेतील फुटीमुळे राजकारण तापलं : शाखेतून कागदपत्रं आणि पैसे चोरीच्या आरोपातून कारवाई
 Shiv-Sena's Dombivli city president arrested
Shiv-Sena's Dombivli city president arrested

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत बंड झाल्यानंतर आता स्थानिक पातळीवरही शिवसैनिक आणि शिंदे समर्थकांमध्ये संघर्ष होताना दिसत आहे. डोंबिवलीत याच मुद्द्यावरून शिवसेना शाखेत वाद झाला. या प्रकरणात शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुलेंना अटक करण्यात आली आहे.

'तुम्ही कोणत्या गटात आहात', या कारणावरून डोंबिवलीत एका शाखेत जोरदार वाद झाला. या वादानंतर शाखेतून कागदपत्र आणि पैसे चोरीच्या आरोपावरून शिवसेना शहर प्रमुख विवेक खामकर आणि त्यांचे सहकारी श्याम चौगुले या दोघांना पोलिसांनी अटक करण्यात आली आहे.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर अनेक ठिकाणी शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी केली गेली. यात काही दिवसांपूर्वी डोंबिवली शहरप्रमुखपदी विवेक खामकर यांची निवड करण्यात आली. शिंदे यांच्या फुटीनंतर शिवसेना मध्यवर्ती शाखेतून एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचे फोटो काढून टाकण्यात आले. यात खामकर यांची महत्वाची भूमिका होती, अशी चर्चा आहे.

दरम्यान, शुक्रवारी संध्याकाळी डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख विवेक खामकर, श्याम चौगुले आणि इतर दोघे डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत पोहोचले. शाखेत शाखाप्रमुख परेश म्हात्रे आणि पवन म्हात्रे बसले होते. 'विवेक खामकर यांनी शाखेत येऊन आम्हाला विचारलं तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही कोणत्या गटात आहात. मी त्यांना सांगितले अजून मी शिवसेनेत आहे. कोणत्याही गटात गेलो नाही,' असं परेश म्हात्रे यांचं म्हणणं आहे.

यानंतर खामकर आणि त्यांची लोक शाखेबाहेर आली. त्यानंतर शाखेवर लावण्यात आलेला बॅनर बघून विवेक खामकर हे संतापले. या बॅनरवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदेंसह इतर शिवसेनेच्या नेत्यांचे फोटो होते. खामकर यांनी पवन म्हात्रेंना दमदाटी करत बॅनर फाडला. त्याचबरोबर शाखेत असलेली काही महत्त्वाची कागदपत्रं आणि रोख रक्कम पंधरा हजार रुपये घेऊन गेले, असा आरोप परेश म्हात्रेंनी केला.

 Shiv-Sena's Dombivli city president arrested
डोंबिवली : पुस्तक देण्याच्या बहाण्याने आलेल्या शेजारच्या तरुणाने...; त्या महिलेच्या हत्येचं गूढ उलगडलं

परेश म्हात्रे यांनी डोंबिवली पश्चिम येथील विष्णुनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी धाव घेतली. त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करत डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख खामकर आणि श्याम चौगुले या दोघांना अटक केली.

दोघांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने दोघांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in