Dussehra Melava: शिंदे गटाची माघार, ठाकरेंचा दसरा मेळावा ‘शिवाजी पार्कवरच’
शिवसेनेचा दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क हे नातं अतुट आहे. मात्र शिवसेनेत दरी पडल्यानंतर मात्र शिंदे आणि ठाकरे गटाचा दसरा मेळावा वेगवेगळा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र यंदाच्या दसरा मेळाव्यात या वादावर पडदा पाडत शिंदे गटाने शिवाजी पार्कसाठी केलेला अर्ज माघार घेतला आहे.
ADVERTISEMENT

Dussehra Melawa: गेल्या कित्येक वर्षांपासून हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनी त्यांच्या हिंदुत्वाच्या विचारांनी (Hindutva thoughts) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) होणारा दसरा मेळावा गाजवला. त्यानंतरही माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former cm uddhav Thackeray) यांनीही तिच परंपरा कायम ठेवत त्यांनी दसरा मेळावा गाजवला. मात्र त्यानंतर शिवसेनेतून (Shivsena) बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळी चूल मांडत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरुन पायउतार केले. शिवसेनेत दोन गट पडल्याने ठाकरे आणि शिंदे गटामध्ये (shinde group) मोठी दरी पडली.
एक पाऊल मागे
त्यानंतर मागील वर्षी दोन्ही गटाने आपापले वेगवेगळे दसरा मेळावे घेऊन शिवसेना पक्षावर दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला. त्यावेळी शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यावरून शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने आले होते. यंदाच्या दसरा मेळाव्यातही हा वाद होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच शिंदे गटाने एक पाऊल मागे घेत दसरा मेळावा घेण्यासाठी करण्यात आलेला अर्ज मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा कोणत्याही वादाशिवाय होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेला पत्र दिले असल्याचे आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Mumbai: धक्कादायक, हृदयविकाराच्या झटक्याने गेला मुंबईतील 13 वर्षाच्या मुलाचा जीव!
शिंदे गटाची माघार
शिवाजी पार्कवर सभा घेण्यासाठी ठाकरे गटाने 1 ऑगस्ट तर शिंदे गटाने 7 ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिकेला अर्ज दिला होता. तो अर्ज आम्ही मागे घेत असल्याचे स्पष्ट मत आमदार सदा सरवणकर यांनी व्यक्त केले आहे. कारण हिंदुच्या सणामध्ये कोणतेही वाद नको आहेत. त्यामुळे हिंदुचां सण आनंदाने साजरा होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे गटाचा दसरा मेळावा
शिंदे गटाने शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी केलेला अर्ज माघार घेत त्यांनी आता आपला दसरा मेळावा आझाद मैदानावर घेणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. शिंदे गटाने आता आपला दसरा मेळावा घेण्यासाठी आझाद मैदान किंवा क्रॉस मैदानावर घेणार असल्याचेही सदा सरवणकर यांनी सांगितले.