शिवसेनेला दुसरा धक्का… प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाविकास आघाडी सरकारमधील Mahavikas Aghadi Government) मंत्री आणि नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांची कारवाई सातत्याने सुरू आहे. आधी अनिल देशमुख (Anil Deshmukh)मग नवाब मलिक Nawab Malik)आणि आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक Shivsena MLA Pratap Sarnaik). ईडीने (ED)सरनाईक यांची तब्बल 11 कोटी 35 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

NSEL घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये ठाणे शहरातील दोन फ्लॅट आणि एका जमिनीचा समावेश आहे. मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत (Money Laundering Act) ही कारवाई करण्यात आली आहे. 2013 साली मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) EOW ने नोंदवलेल्या FIR क्रमांक 216 चा तपास ईडीने सुरु केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीची शिवसेनेवर दुसरी कारवाई

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वीच अंमलबजावणी संचालनालयाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची जवळजवळ सहा कोटींची मालमत्ता जप्त केली होती. या कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती.

भाजपला जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी ते उद्धव ठाकरेंकडे सातत्याने करत आहेत. अशा स्थितीत आगामी काळात महाविकास आघाडी आणि भाजपमधील संघर्ष वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, त्याआधीच शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे आता शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

ADVERTISEMENT

Pratap Sarnaik: रिक्षा चालक ते 125 कोटींचा मालक… कोण आहेत आमदार प्रताप सरनाईक?

ADVERTISEMENT

NSEL घोटाळ्याप्रकरणी प्रताप सरनाईक यांना चौकशीसाठी अनेक समन्स पाठवण्यात आले होते. त्यांच्या मुलाचीही ईडीने चौकशी करण्याचा प्रयत्न केला होता. सरनाईक यांची यापूर्वी ईडीने चौकशीही केली होती. अनेक कागदपत्रांचीही छाननी करण्यात आली. त्यानंतर त्याच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला.

त्यानंतर सरनाईक यांना अनेक समन्स पाठवण्यात आले मात्र ते ईडीसमोर हजर झाले नाहीत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर सरनाईक एकदा ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले होते. त्यानंतर आज ईडीने त्याच्यावर थेट कारवाई केली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT