एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना : निकाल लांबणार? सत्ता संघर्षाचं प्रकरण घटनापीठाकडे
शिवसेना फुट आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच निकाली लागण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने शिवसेनेतील फूट, निवडणूक आयोगातील प्रकरण, विधानसभा उपाध्यक्ष, शपथविधी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांचं प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. या याचिकांवर पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आता नेमकं काय होणार […]
ADVERTISEMENT

शिवसेना फुट आणि राज्यातील सत्तासंघर्षाचा पेच निकाली लागण्यासाठी आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने शिवसेनेतील फूट, निवडणूक आयोगातील प्रकरण, विधानसभा उपाध्यक्ष, शपथविधी संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकांचं प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग केलं आहे. या याचिकांवर पुढील सुनावणी २५ ऑगस्ट रोजी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आता नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना आणि सरकार स्थापनेसंदर्भातील पेच निर्माण झालेला असून, त्या संदर्भातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. २२ ऑगस्ट रोजी या याचिकांवर सुनावणी होणार होती. मात्र, सुनावणी होऊ शकली नाही.
त्यानंतर आज शिवसेनेचे वकील कपिल सिब्बल यांनी यांनी कोर्टात हे प्रकरण आज मेन्शन केलं. सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवर सुनावणी घेण्यास परवानगी दिली. त्यानंतर आज झालेल्या सुनावणीअंती न्यायालयाने हे प्रकरण ५ सदस्यीय मोठ्या घटनापीठाकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला.
शिवसेना विरुद्ध शिंदे गट : सर्वोच्च न्यायालयाने प्रकरण घटनापीठाकडे का सोपवलं?
सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ५ सदस्यीय घटनापीठाकडे सोपवताना न्यायमूर्ती म्हणाले की, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असून, ते आमदारांवर अपात्रतेची कारवाई करू शकतात का? यावर सुनावणी होणं आवश्यक आहे आणि त्यामुळे घटनापीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणं गरजेचं आहे.