राज चेंगप्पा, ग्रुप एडिटोरिअल डायरेक्टर (पब्लिशिंग), इंडिया टुडे ग्रुप
Gautam Adani and NDTV: नवी दिल्ली: भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती गौतम अदाणी यांनी इंडिया टुडेला (India Today) दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत (Exclusive Interview) अनेक गोष्टींवर आपली ठाम मतं व्यक्त केली आहे. याच मुलाखतीत गौतम अदाणी (Gautam Adani) यांना त्यांनी नुकत्याच केलेल्या NDTV कराराबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर गौतम अदाणी यांनीही सविस्तर उत्तर दिलं आहे. पाहा नेमकं अदाणी काय म्हणाले. (exclusive interview gautam adani gave a clear answer about ndtv question and his policy)
प्रश्न: गौतम भाई, तुमची व्यवस्थापन शैली काय आहे?, तुमच्या यशाचा नेमका मंत्र काय आहे?
गौतम अदाणी: आमचे सर्व व्यवसाय, उद्योग हे व्यावसायिक, सक्षम अशा सीईओमार्फत चालवले जातात. मी त्यांच्या दैनंदिन कामात ढवळाढवळ करत नाही. माझी भूमिका रणनीती ठरवणं, भांडवलाचं वाटप करणं आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा घेणं यापुरताच मर्यादित आहे.
त्यामुळेच माझ्याकडे एवढ्या मोठ्या आणि वैविध्यपूर्ण संस्थाचे व्यवस्थापन करण्याचा वेळ असतो. तसेच अनेक नवीन व्यवसायांच्या अधिग्रहणाच्या संधी शोधण्यासही वेळ मिळतो.
प्रश्न: तुम्ही नुकतेच NDTV मीडिया ग्रुप अधिग्रहीत केला आहे. इथे देखील तुमची तशीच भूमिका असेल का? जशी तुमची तुमच्या इतर व्यवसायाबाबत आहे, आणि दुसरे म्हणजे तुम्ही संपादकीय स्वातंत्र्य कसे सुनिश्चित कराल?
गौतम अदाणी: राज, संपादकीय स्वातंत्र्यावर, मला स्पष्टपणेच बोलायचे आहे की, एनडीटीव्ही हे एक विश्वासार्ह, स्वतंत्र, जागतिक नेटवर्क असेल ज्यामध्ये व्यवस्थापन आणि संपादकीय यांच्यात एक स्पष्ट लक्ष्मण रेखा असेल. मी जे बोलत आहे त्या प्रत्येक शब्दाबाबत तुम्ही अविरतपणे वादविवाद करू शकता आणि त्याचा अर्थ लावू शकता, जसे अनेकांनी केलेही आहे, परंतु आम्हाला जोखण्याआधी आम्हाला थोडा वेळही द्यावा.
असं म्हणत गौतम अदाणी यांनी स्पष्ट केलं की, ते आपल्या इतर व्यवसायात ज्याप्रमाणे ढवळाढवळ करत नाही. तसंच धोरण ते NDTV च्या बाबतीत देखील अवलंबतील. तसंच त्यांचा संपादकीय धोरणांमध्ये देखील कोणताही हस्तक्षेप नसेल असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
NDTV हस्तांतरीत केल्यानंतर अदाणी समूहावर सोशल मीडियावरुन बरीच टीकाही झाली होती. मात्र, आपण ज्याप्रमाणे दुसऱ्या उद्योगाचे व्यवस्थापन करतो तसंच व्यवस्थापन हे या उद्योगाचं देखील करु असं गौतम अदाणी हे यावेळी म्हणाले.