लोकल प्रवास करताना मास्क न लावल्यास भरावा लागणार दंड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, या पार्श्वभूमीवर नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशात मुंबई महापालिकेने एक महत्त्वाचा आदेश दिला आहे तो हा आहे की मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गावरील म्हणजेच मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्क लावला नसल्यास कारवाई केली जाणार आहे. फक्त लोकल ट्रेन्सच नाही सार्वजनिक वाहतूक करत असणाऱ्या प्रवाशाने मास्क लावला नसल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल असं मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान, खासगी कार्यालयांमध्ये, उद्यानात, सार्वजनिक ठिकाणी, सार्वजनिक अस्थापनांमध्ये मास्क न लावणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. रेल्वे प्रवास करताना किंवा सार्वजनिक मास्क लावला नाही तर 200 रुपये दंड घेतला जाणार आहे असंही मुंबई महापालिकेने स्पष्ट केलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुंबईतील पश्चिम, मध्‍य आणि हार्बर उपनगरीय रेल्‍वे सेवांच्‍या गाड्यांमध्‍ये विना मास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी प्रत्‍येकी लाईनवर १०० यारितीने एकूण ३०० मार्शल्‍स नेमून विनामास्‍क प्रवास करणाऱयांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

विनामास्‍क फिरणाऱयांवर कारवाई करण्‍यासाठी आता पोलिसांनाही अधिकार देण्‍यात येत असून पोलीसदेखील मार्शल म्‍हणून नागरिकांना दंड आकारुन कारवाई करु शकणार आहेत असंही महापालिकेने म्ह्टलं आहे.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारच्‍या नियमावलीप्रमाणे, आता ब्राझिलमधून भारतात येणाऱ्या प्रवाशांनाही संस्‍थात्‍मक विलगीकरणात रहावे लागणार आहे. यामुळे मुंबई विमानतळावर ब्राझिलमधून येणाऱया प्रवाशांना सक्‍तीने सात दिवसांच्‍या संस्‍थात्‍मक विलगीकरणात ठेवण्‍याचा निर्णय बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून त्‍याची अंमलबजावणी सुरु करण्‍यात आली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT