Sangli : ‘आधी जात, मग खत…’; सरकारच्या अजब कारभारानं शेतकऱ्यांमध्ये प्रचंड चीड

मुंबई तक

Farmers news in Maharashtra : सांगली : रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना (Farmers) जात नमूद करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसंच शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वादाचेही प्रसंग उभे राहतं आहेत. या प्रकारावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकारला धारेवरं धरलं […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Farmers news in Maharashtra :

सांगली : रासायनिक खत खरेदी करताना शेतकऱ्यांना (Farmers) जात नमूद करावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार सांगली (Sangli) जिल्ह्यात समोर आला आहे. या प्रकारामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसंच शेतकरी आणि खत विक्रेत्यांमध्ये वादाचेही प्रसंग उभे राहतं आहेत. या प्रकारावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनीही सरकारला धारेवरं धरलं आहे. (Farmers are asked about the cast by sellers while buying chemical fertilizers)

नेमका काय प्रकार घडला आहे?

रासायनिक खतांसाठी शासन संबंधित खत कंपनीला अनुदान देते. अनुदान देण्यासाठी तीन-चार वर्षांपासून ई-पॉस मशिन यंत्रणा कार्यन्वित केली आहे. शेतकर्‍यांना दुकानात खत खरेदीसाठी गेल्यानंतर नाव, मोबाईल क्रमांक, आधारकार्ड क्रमांक, पोत्यांची संख्या याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर पॉस मशिनवर शेतकर्‍यांना अंगठा घेऊन खत दिले जाते.

मात्र तीन दिवसांपूर्वी ई-पॉस मशिन या सॉप्टवेअर यंत्रणेत काही अपडेटस् आले आहेत. यानुसार शेतकर्‍यांची वर्गवारी करण्यात येत आहे. यासाठी शेतकर्‍यांना त्यांची जात विचारण्यात येत आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. ई-पॉस मशीन मध्ये जातीचा ऑप्शन का असा सवालही उपस्थित होत आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp