अक्षयच्या फौजीची लोकप्रियता झाली कमी

मुंबई तक

प्रजासत्ताक दिनी लाँच झालेला अक्षय कुमारचा फौजी हा आपल्या मातीतला गेम लाँच झाला तेव्हा जोरदार चालला. दोन दिवसांत 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी तो डाउनलोडही केला. पण आता लाँचिंगच्या 10 दिवसांनंतर आता मात्र त्याची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र आहे. पहिल्या दोन दिवसात या गेमने चांगला जोर धरल्याने आता पुढे हा गेम पबजीचे रेकॉर्ड्स मोडणार अशी शक्यता […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

प्रजासत्ताक दिनी लाँच झालेला अक्षय कुमारचा फौजी हा आपल्या मातीतला गेम लाँच झाला तेव्हा जोरदार चालला. दोन दिवसांत 50 लाखांपेक्षा जास्त जणांनी तो डाउनलोडही केला. पण आता लाँचिंगच्या 10 दिवसांनंतर आता मात्र त्याची लोकप्रियता कमी झाल्याचं चित्र आहे.

पहिल्या दोन दिवसात या गेमने चांगला जोर धरल्याने आता पुढे हा गेम पबजीचे रेकॉर्ड्स मोडणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. प्ले-स्टोअरवर या गेमला युजर्सनी पाचपैकी 4.7 स्टार रेटिंगही दिले होते. पण काहीच दिवसांत आता या गेमबद्दल निगेटिव्ह रिव्ह्यू यायला सुरूवात झाली आहे. 4.7 रेटिंगवरुन या गेमला आता युजर्सकडून 3 स्टार रेटिंग दिली आहे. फौजीच्या गेम-प्ले आणि ग्राफिक्सबाबत काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, काहींनी हा गेम अपेक्षाभंग करत असल्याचं म्हटलंय. पब्जीप्रेमी मुद्दाम या गेमला कमी रेटिंग देतायत असंही म्हटलं जातंय.

सध्या हा गेम केवळ गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षावरील थीममध्येच उपलब्ध आहे. पण लवकरच ‘टीम डेथमॅच’, ‘फ्री फॉर ऑल’ आणि ‘बॅटल रॉयल मोड’ अशा तीन थीम गेममध्ये येणार आहेत. शिवाय आयफोन युजर्ससाठी अजूनही तो लाँच झालेला नाही, त्यामुळे आयफोन युजर्सना फौजी खेळण्यासाठी अजून वाट बघावी लागणार आहे. भारतात पबजी बॅन झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी हा गेम तयार करण्यात आला आहे. एनकोअर गेमिंग नावाच्या एका भारतीय कंपनीने हा गेम डेव्हलप केला असून अभिनेता अक्षय कुमार गेमला प्रमोट करत आहे.

फौजी गेमबद्दलच्या आणखी अपडेट्ससाठी हे व्हिडिओ देखील पहा..

हे वाचलं का?

    follow whatsapp