कंगनाविरोधात FIR, शिख समुदायाकडून तक्रार आल्यानंतर पोलिसांची कारवाई

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अभिनेत्री कंगना रणौतच्या विरोधात मुंबई पोलिसांनी धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. शिख समुदायाने या संदर्भातली तक्रार केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. कंगनाने काही दिवसांपूर्वीच भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी शिख समुदायाला आपल्या बुटांखाली मच्छरांप्रमाणे चिरडले असं वक्तव्य केलं होतं. या प्रकरणी भावना दुखावल्याने शिख समुदायाने कंगनाच्या विरोधात पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. ज्यानंतर आता पोलिसांनी FIR नोंदवला आहे.

कलम 295 A च्या अन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणीचं हे कलम आहे. वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आता कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘स्वातंत्र्य भिकेनंच मिळालं, कंगना खरंच बोलली!’ विक्रम गोखलेंची जीभ घसरली

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय म्हणाली होती कंगना?

केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द केले त्यानंतर कंगनाने एक पोस्ट लिहिली होती. या पोस्टमध्ये कंगना म्हणाली की खलिस्तानी दहशतवादी सरकारला त्रास देत आहेत. मात्र तुम्ही त्या महिलेला विसरू नका ज्या महिला पंतप्रधान व्यक्तीने या सगळ्या खलिस्तान्यांना आपल्या बुटांखाली चिरडलं होतं. असं वक्तव्य कंगनाने केलं होतं. तिच्या या फेसबुक पोस्टवर खूप टीका झाली होती.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

आता शीख समुदायाने याच तिच्या पोस्टवरून भावना दुखावल्या असल्याने कंगना रणौत विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी कंगनाच्या विरोधात FIR दाखल केली आहे. या वक्तव्याच्या आधीही वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. आपल्या देशाला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं, खरं स्वातंत्र्य तर 2014 मिळालं असं म्हटलं होतं. त्यावरूनही बराच वाद निर्माण झाला आहे.

शेतकऱ्यांची तुलना खलिस्तानी आतंकवाद्यांसोबत केल्याने कंगना चांगलीच चर्चेत आली होती. कंगनाच्या या प्रतिक्रियेनंतर दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीने सोमवारी कंगनाविरोधात मुंबईत तक्रार दाखल केली आहे. यासंदर्भात आज मंगळवारी दिल्ली शीख गुरुद्वार मॅनेजमेंट कमिटीचे अध्यक्ष आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते मनजिंदर सिरसा महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन कंगनाविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करणार आहेत. शीख समुदायाच्या विरोधात सोशल मीडियावर पोस्टमध्ये अपमानजनक भाषा वापरल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT