Parambir Singh: माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल, ‘मुंबई Tak’ सोबत बोलताना काय म्हणाले परमबीर?
मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गुरुवारी (25 नोव्हेंबर) अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. परमबीर सिंह हे देश सोडून पळून गेले आहेत असे अनेक दावे केले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने देखील […]
ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे गुरुवारी (25 नोव्हेंबर) अचानक मुंबईत दाखल झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेले परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाल्याने आता अनिल देशमुख यांच्या वसुली प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. परमबीर सिंह हे देश सोडून पळून गेले आहेत असे अनेक दावे केले जात होते. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने देखील आपण कुठे आहात असा सवाल? परमबीर सिंग यांना केला होता. त्यानंतर आज अचानक परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले आहेत.
पाहा ‘मुंबई Tak’शी बोलताना परमबीर सिंग काय म्हणाले
‘मी इथे चौकशीसाठी आलो आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने इथे आलो असून चौकशीला मी सामोरं जाणार आहे. माझ्यावर ज्या काही केसेस टाकण्यात आल्या आहेत त्याविषयी मला इथे काहीही बोलायचं नाही, मला जे काही बोलायचं ते मी कोर्टातच बोलेन.’ असं परमबीर सिंग यावेळी म्हणाले.
गेल्या अनेक दिवसांपासून परमबीर सिंग हे चंदीगडमध्येच राहत होते. ‘मुंबईत आपल्या जीवाला धोका आहे, त्यामुळे आपण तिथे येऊ शकत नाही’, असे त्यांनी आपल्या वकिलांमार्फत कोर्टाला सांगितले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्यांना फटकारले आणि तपासात सहभागी होण्याचे निर्देश दिले होते. आता परमबीर सिंग तपासात सहभागी होण्यासाठी मुंबईत आले आहेत. मुंबई Tak शी बोलताना त्याने सांगितले की, ‘मी सध्या फार काही शेअर करू शकत नाही. पण देशाच्या न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. मला न्याय मिळेल’, अशी आशा आहे.